शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

१६ महिन्यांच्या मुलीच्या नाकातून काढला ब्रेन ट्यूमर; जगातील सगळ्यात कमी वयाच्या चिमुकलीचे ऑपरेशन

By manali.bagul | Published: January 22, 2021 6:18 PM

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अमायरा न्यूरोएंडोस्कोपी होणारी सगळ्यात लहान मुलगी ठरली आहे.

PGIMER चंदीगडमध्ये एका एंडोस्कोपिक सर्जनने १६ महिन्यांच्या अमायराचे ब्रेन ट्यूमरचे उपचार करून इतिहास रचला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अमायरा न्यूरोएंडोस्कोपी होणारी सगळ्यात लहान मुलगी ठरली आहे.  या चिमुरडीच्या नाकातून ट्यूमर यशस्वीरित्या काढण्यात आला आहे.  हे दुर्मिळ ऑपरेशन वैद्यकिय तज्ज्ञांच्या गटाने केले आहे. यात डॉक्टर सुशांत न्यूरो सर्जरी डिपार्टमेंटमधून होते तर डॉक्टर रिजुनीता ईएनटी डिपार्टमेंटमधून होते.

अमायरा उत्तराखंडची रहिवासी असून गेल्या २० दिवसांपासून ही चिमुरडी आपल्या आईला प्रतिसाद देत नव्हती. तिला पाहायला खूप त्रास होत होता. जेव्हा या चिमुरडीचे एमआरआय करण्यात आले त्यावेळी ३ सेमीचा एक ट्यूमर, क्रॅनियोफॅरिजियोमा ऑप्टीक नर्व आणि हायपोथॅलेमसजवळ होता. हा ट्यूमर एक वर्षाच्या मुलीच्या दृष्टीनं फार मोठा होता.

डॉक्टरांनी सांगितले की, ''अशा प्रकारचे ट्यूमर ओपन सर्जरीने काढले जातात. बाकीच्या भागात रेडिएशन थेरेपी केली जाते. पण आता अशा प्रकारचे ऑपरेशन्स नाकाद्वारे केले जात आहेत. ही सर्जरी ईएनटी  तज्ज्ञ करतात. साधारपणपणे असे ऑपरेशन  ६ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचे केले जातात. अमायरा ही या वयात ऑपरेशन केलेली पहिली  चिमुकली ठरली आहे.''

याआधीही अमेरिकेत २ वर्षांच्या एका लहान मुलांवर अमेरिकेतील स्टेनफोर्डमध्ये असे ऑपरेशन करण्यात आले होते.  लहान मुलांच्या नाकातून ट्यूमर काढणं खूपच चॅलेजिंग असते. कारण त्यांचे नॉस्ट्रिल्स खूप लहान असतात. हाडं कमी प्रमाणात विकसित झालेली असतात. या ऑपरेशनसाठी लहान साधनांचा वापर केला जातो. चिंताजनक! लसीकरणाला सुरूवात होताच कोरोना लसीबाबत चीनी वैज्ञानिकांचा खुलासा

डॉक्टर सुशांत यांनी सांगितले की, ''ट्यूमरपर्यंत पोहोचणं खूप कठीण होतं. कारण नाक आणि  हाडं परिपक्व झालेले नसतात. सर्जरी करताना फ्लूईड बाहेर येण्याचीही भीती असते. ६ तासांपर्यंत सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये डॉक्टरांना यश मिळालं. त्यानंतर अमायराला आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं. हळूहळू या चिमुकलीच्या प्रकृतीत सुधारणा होत असून सीटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आहेत.'' ..म्हणून भारतात कोरोना लस घेण्यासाठी घाबरताहेत लोक; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेHealthआरोग्य