आमीर खानचा 'गजनी' हा सिनेमा तुम्ही पाहिला असेलच. त्यात आमीर खानला 'शॉर्ट टर्म मेमरी लॉस' हा आजार असतो. म्हणजे तो काही वेळासाठी हे विसरून जातो की, तो कोण आहे? तो कुठे राहतो? असाच आजार कॅटलिन लिटिल नावाच्या १६ वर्षीय मुलीला झाला आहे. ती नॉर्थ कॅरोलीनाच्या गुइलफोर्ड हाय स्कूलमध्ये होती. क्रॉस-कंट्रीची प्रॅक्टिस सुरू होती. अचानक टीममधील एकाने तिला धक्का दिला आणि ती पडली. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी सांगितले की, तिला एमनेसिया हा दुर्मिळ आजार झाला आहे. कॅटलिन आजार असा आहे की, ती सकाळी उठल्यावर तिला आधीचं काहीच आठवत नाही. हा आजार शॉर्ट टर्म मेमरीसारखाच आहे. म्हणजे ती सकाळी उठते आणि तिला वाटतं की, ऑक्टोबर २०१७ सुरू आहे.
'त्या' दिवसांनंतर काही लक्षात राहत नाही
कॅटलिनसोबत झालेल्या घटनेमुळे गेल्या दीड वर्षापासून तिचं पूर्ण जीवनच बदलून गेलं आहे. कॅटलिन सांगते की, ती जेव्हा सकाळी उठते तेव्हा तिला वाटतं २०१७ चा ऑक्टोबर महिना सुरू आहे. आणि क्रॉस-कंट्री प्रॅक्टिसचा तो दिवस जणू कालचाच होता.
रोज सकाळी तिला सांगावं लागतं जुनं आयुष्य
कॅटलिनचे वडील सांगतात की, 'मला नेहमीच भीती असते. मला चिंता लागलेली असते की, तिने अचानक असं म्हणू नये की, हे सगळं खोटं आहे. आणि मी तिच्याशी असं चुरीचं का करत आहे. पण दररोज मला माझ्या या भीतीवर नियंत्रण ठेवावं लागतं आणि तिला सगळं खरं सांगावं लागतं'.
नोट्सने होते तिला मदत
कॅटलिन ही फारच समजदार आहे. सकाळी उठल्यावर तिला जरा आश्चर्य तर वाटतं, पण नंतर समजून जाते. ती हा प्रश्न आवर्जून विचारते की, 'असं कसं होऊ शकतं?'. तेव्हा तिचे आई-वडील तिला बेडच्या बाजूला ठेवलेल्या नोट्स देतात. त्या नोट्समध्ये २०१७ च्या त्या दिवसानंतरच्या कॅटलिनसोबत घडलेल्या घटनांचा उल्लेख आहे. ती या नोट्स १० ते १५ मिनिटात वाचते. हे यासाठी जेणेकरून ती विसरलेल्या गोष्टींबाबत अपडेट व्हावी.
उपचारावर रोज इतका होतो खर्च
कॅटलिनसाठी प्रत्येक दिवस नवीन आणि तिला रोज नवीन सुरूवात करावी लागते. ती शाळेत जाते तेव्हा तिला रोज तिची बसण्याची जागा तिला सांगावी लागते. रोज ती जे शिकते, जे बघते ते नंतर विसरून जाते. अनेक डॉक्टरांनी कॅटलिनला मदत करण्याचा प्रयत्न केला, पण अजून तिच्या काही सुधारना बघायला मिळाली नाही. तिच्या उपचारावर दर दिवसाला १ हजार डॉलरचा खर्च करावा लागतो. आई-वडील हा खर्च उचलू शकतील अशी त्यांची स्थिती नाहीये. मात्र, 'गो फंड मी' च्या माध्यमातून क्राउड फंडिंगने तिला मदत झाली.
कॅटलिनवर तयार झाली डॉक्यूमेंट्री
कॅटलिनच्या जीवनावर MyFox8 ने एक डॉक्युमेंट्री सीरिज ‘Caitlin Can’t Remember’ तयार केली आहे. तसेच तिच्या परिवारातील लोक सतत हे प्रयत्न करीत आहेत की, तिचं आयुष्य आधीसारखं सामान्य व्हावं. तर कॅटलिन म्हणते की, ती आता या आजारासोबत जगणं शिकली आहे.