शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

१७ लाखांचा हेअरकट; १० हजार किमी प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 5:33 AM

Jara Hatke: तुम्हाला तुमच्या आवडीचा हेअरकट करायचा असला तर तुम्ही काय करता? तुमच्या नेहमीच्या सलूनवाल्याकडे जाता, तुम्हाला कसा हेअरकट करायचा आहे, हे त्याला विस्तारानं सांगता, त्यासंदर्भातला फोटो दाखवता.. आणि त्याच्याकडून तसा हेअरकट करवून घेता.

तुम्हाला तुमच्या आवडीचा हेअरकट करायचा असला तर तुम्ही काय करता? तुमच्या नेहमीच्या सलूनवाल्याकडे जाता, तुम्हाला कसा हेअरकट करायचा आहे, हे त्याला विस्तारानं सांगता, त्यासंदर्भातला फोटो दाखवता.. आणि त्याच्याकडून तसा हेअरकट करवून घेता. आपल्या नेहमीच्या सलूनवाल्याला हे जमणार नाही, असं तुम्हाला वाटलं, किंवा तो फार पैसे सांगतोय असं वाटलं, तर तुम्ही आणखी कोणाकडे तरी जाता, त्याच्यापेक्षा चांगला मेकअप आर्टिस्ट शोधता आणि त्याला पैसे देता.. त्याच्याकडून तुमच्या मनासारखा हेअरकट करून घेता..अमेरिकेतील एका तरुणीच्या बाबतीतही नेमका असाच किस्सा घडला. ब्रायन एलिस तिचं नाव. तिला तिच्या आवडीचा हेअरकट करायचा होता. त्यासाठी ती तिच्या नेहमीच्या सलूनवाल्याकडे गेली, त्याला हेअरकटचा फोटो दाखवला आणि त्याला सांगितलं, नेमका असाच हेअरकट मला हवाय. त्यात काहीही कमी नको, की जास्त नको. असा म्हणजे अस्साच! या आर्टिस्टनं तिला केवळ त्या हेअरकटचे किती पैसे सांगावेत? या हेअरकटसाठी साधारण चार हजार डॉलर्स (सुमारे ३.१२ लाख रुपये) खर्च येईल असं त्यानं तिला सांगितलं! शिवाय आता महागाई किती वाढली आहे, नेहमीच्या भावात परवडत नाही, तुम्ही निवडलेला हेअरकट एकदम खासमखास असल्यानं त्यासाठी प्रचंड मेहनतही घ्यावी लागेल.. वगैरे वगैरे उपदेशाचे बरेच डोस तिला पाजले!...ब्रायनचं डोकं फिरलं. तिला थोडा रागही आला.. आपण दरवेळेस याच्याकडूनच हेअरकट करून घेतो, तो मागेल तितके पैसे त्याला देतो, तरीही दरवेळी तो पैसे वाढवतोच.. आपण म्हणजे काय त्याला पैशांचं झाड वाटलो की काय?.. तिनं आपल्या या सलूनवाल्याच्या नावावर काट मारली आणि इंटरनेटवर ती दुसरा हेअर स्टायलिस्ट शोधायला लागली आणि तिला हवा होता तसा हेअर स्टायलिस्ट सापडला! हा तर आणखी ‘ओरिजिनल’ होता!वेगवेगळ्या प्रकारच्या, फॅन्सी, अफलातून आणि किचकट हेअरस्टाइलसाठीच तो फेमस होता. शिवाय त्याची फी तिच्या नेहमीच्या हेअर स्टायलिस्टच्या तुलनेत अत्यंत कमी होती. कमी म्हणजे किती कमी? नेहमीच्या स्टायलिस्टला तिला चार हजार डॉलर्स मोजावे लागणार होते, पण नेटवर जो हेअर स्टायलिस्ट ब्रायननं शोधला, त्याची फी तुलनेत अगदी कमी, म्हटलं तर ‘फुकटात’ होती. ज्या हेअरकटसाठी तिला चार हजार डॉलर्स लागणार होते, तोच हेअरकट संपूर्ण खर्चासह तिला फक्त ४५० डॉलर्समध्ये (सुमारे ३५ हजार रुपये) पडणार होता. फरक फक्त एवढाच होता, तिचा नेहमीचा हेअर स्टायलिस्ट अमेरिकेतलाच, तिच्या घराजवळचाच होता, हा नवा हेअर स्टायलिस्ट मात्र टर्कीमध्ये होता! ब्रायननं ठरवलं, टर्की तर टर्की, इतके पैसे वाचत असतील तर तिथे जाऊन हेअरकट करायला काय हरकत आहे? तिनं तसा निर्णयही घेतला. टर्कीच्या त्या हेअर स्टायलिस्टशी संपर्क साधला. तारीख नक्की केली आणि विमानानं ती टर्कीला पोहोचली. अमेरिका ते टर्की हे अंतर तब्बल दहा हजार किलोमीटरचं. तिथे जायचं तर काही दिवस तिथे राहणं आलं. हॉटेलात थांबणं आलं..या साऱ्या गोष्टी ब्रायननं अतिशय आनंदानं केल्या. ठरल्याप्रमाणे या नव्या हेअर स्टायलिस्टला ती भेटली. तब्बल आठ तास खर्चून त्यानं ब्रायनला तिला हवा तसा हेअरकट करून दिला. एकदम डिट्टो. सेम टू सेम. ब्रायनही खूश झाली. आपल्या निर्णयाचं तिला अपरंपार कौतुक वाटलं. बेस्ट हेअरकट, शिवाय इतके पैसे आपण वाचवले याचाही तिला प्रचंड अभिमान वाटला. टर्कीहून परत येताच ब्रायननं आपल्या नव्या हेअरकटचा फोटो सोशल मीडियावर टाकला. त्या फोटोवर तिनं लिहिलं होतं, आपल्या आवडत्या हेअरकटसाठी अमेरिकेत जेव्हा तुमच्याकडे चार हजार डॉलर्सची मागणी केली जाते, त्यावेळी तुम्ही टर्कीच्या दिशेने उड्डाण घेता आणि आपलं स्वप्न साकार करता !..

‘खिसा फाटला’, हे कोण सांगणार?ज्या हेअरकटसाठी ब्रायनला अमेरिकेत चार हजार डॉलर्स लागणार होते, तोच हेअरकट तिनं टर्कीमध्ये केवळ ४५० डॉलर्समध्ये करून घेऊन खूप पैसे वाचवले हे खरं, पण टर्कीला विमानानं जाणं, दोन आठवडे तिथे हॉटेलमध्ये राहाणं यासाठी तिला तब्बल २२ हजार डॉलर्स (सुमारे १७.१६ लाख रुपये) खर्च आला. हेदेखील ब्रायननंच सोशल मीडियावर शेअर केलं आहे; पण पैसे वाचवायच्या नादात ती पाच पटीपेक्षाही जास्त पैसे खर्च करून आली, हे तिला कोण सांगणार? ब्रायन आता सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होते आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके