(Image Credit : huffpost.com)
ब्रेकअप झाल्यावर काय होतं हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. काही यातून बाहेर पडतात, तर काही अनेक दिवस तडपत राहतात. अशीच एक ब्रेकअपशी संबंधित घटना समोर आली आहे. अमेरिकेतील नेब्रास्कामधील ही घटना आहे. इथे एक तरूणी तिच्या अपार्टमेंटमध्ये बसून एक्स-बॉयफ्रेन्डची प्रेम-पत्रे जाळत होती. पण तिच्या बेजबाबदारपणामुळे अपार्टमेंटमध्ये आग लागली. सुदैवाने आग जास्त पेटली नाही, नाही तर घटना गंभीर झाली असती.
काय आहे घटना?
Daily Mail ने दिलेल्या वृत्तानुसार, १९ वर्षीय आरिउना चॅनेल लिलार्ड एका ब्यूटेन टॉर्चच्या मदतीने एक्स बॉयफ्रेन्डची पत्रं जाळत होती. पण पत्र व्यवस्थित आग पकडत नव्हते. अखेर निराश होऊन तिने काही पत्रं जमिनिवर फेकून झोपण्यासाठी निघून गेली. थोड्या वेळाने जेव्हा ती उठली तेव्हा तिला आढळलं की, रूममधील कारपेट पेटलंय. अशात तिने लगेच इमरजन्सी दलाला बोलवलं.
लिंकन पोलीस विभागाच्या प्रवक्त्यांनी 'डेलीमेल' ला सांगितले की, तरूणीने एक्स बॉयफ्रेन्डने पाठवलेली पत्रं जाळण्यासाठी ब्यटेन टॉर्च वापरली होती. पण पत्रं पेटली नाहीत म्हणून तिने खाली फेकून दिली आणि झोपायला निघून गेली. तिला याची जराही कल्पना नव्हती की, पत्रांवर ठिणगी पडली आहे, ज्याने कारपेटवर आग लागली. जेव्हा स्मोकडिटेक्टर बंद झालं, तेव्हा तिची झोप उडाली आणि तिने मदतीसाठी फोन केला.
४ हजार डॉलरचं नुकसान
अग्नीशमन दलाच्या जवानांनी लगेच पोहोचून आग विझवली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आगीमुळे अपार्टमेंटचं ४ हजार डॉलर म्हणजेच जवळपास २,८५,२७० रूपयांचं नुकसान झालं. सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाही. तरूणीला आता बेजबाबदारपणे वागल्याने कोर्टात सादर केलं जाईल.