सौदी अरबमध्ये एक विचित्र मेडिकल केस समोर आली आहे. इथे डॉक्टरांनी एका यशस्वी ऑपरेशननंतर एका महिलेच्या पोटातून 2 किलो वजनाचा केसांचा गोळा बाहेर काढला. केसांचा इतका मोठा गोळा पाहून डॉक्टरही हैराण झाले.
'अरब मीडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेच्या पोटात बऱ्याच महिन्यांपासून जोरात वेदना होत होत्या. पण अनेक टेस्ट करूनही पोट दुखण्यामागचं कारण समोर येऊ शकलं नव्हतं. नंतर वेदना वाढल्यामुळे तिचं ऑपरेशन करण्यात आलं.
या महिलेच्या पोटात कधी जोरात तर कधी कमी प्रमाणात वेदना होत होत्या. यादरम्यान तिला पोटात काही वजनी असल्याचाही संशय येत होता. रिपोर्टनुसार, जेव्हा महिलेची स्थिती फार जास्त गंभीर झाली आणि वेदना होण्याचं कारण समोर आलं नाही तर तिचं ऑपरेशन करण्यात आलं.
ऑपरेशन करताना तिच्या पोटात 2 किलो वजनाचा केसांचा गोळा डॉक्टरांनी बाहेर काढला. हा केसांचा गोळा पाहून डॉक्टरही हैराण झाले होते.
अनेक टेस्ट करूनही महिलेच्या पोटात का वेदना होतात हे समोर न आल्याने तिला किंग अब्दुल अजीज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. इथे तिच्या पोटात वजनी काही आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तिच्या अनेक टेस्ट केल्यात.
सिटी हेल्थ डिपार्टमेंटच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ऑपरेशन करून महिलेल्या पोटातून 2 किलो वजनाचा केसांचा गोळा काढण्यात आला. महिलेची स्थिती आता ठीक आहे. पण महिलेच्या पोटात इतके केस आले कुठून हे काही सांगण्यात आलेले नाही.