कोरोनाकाळात अनेकांचा कल नोकरीकडून बिझनेसकडे वळालेला पाहायला मिळाला. कारण कोरोनाकाळात नोकरीवरून काढून टाकल्यानंतर किंवा पगार कपात झाल्यानं अनेकांनी लहान मोठा बिझनेस करता येईल का? असा विचार करायला सुरूवात केली. कमी वयात नोकरीचा मार्ग सोडून बिझनेस करून लाखोंचे उत्पन्न घेत असलेल्या दोन बहिणींबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ऑनलाईन बिझनेस कसा करायचा याबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे राहणाऱ्या दोन बहिणींनी स्वत:चा चपलांचा व्यवसाय सुरु केला आहे. अवघ्या 300 रुपयांच्या एका चपलेमुळे या बहिणींना बिझनेस करण्यासाठी प्रेरणा मिळाली.
फक्त भारतातच नाही तर जगभरात या बहिणींनी तयार केलेल्या चपलांना खूप मागणी आहे. प्रत्येक महिन्याला त्यांच्याकडे शंभरपेक्षा जास्त चपलांची मागणी असते. तुमचा विश्वास बसणार नाही पण या व्यवसायातून त्या वर्षाला 3 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करतात. दैनिक भास्करनं यााबाबत अधिक माहिती दिली आहे.
लखनऊ च्या रहिवासी असलेल्या 27 वर्षांच्या नाजिशने आपल्या बहिणीबरोबर चपलांचा व्यवसाय सुरू केला आहे. नाजिशच्या घरची आर्थिक परिस्थिती फारशी बरी नव्हती. तिचे आई-वडील टेलरिंगचं दुकान चालवायचे. त्यांनी दोन्ही बहिणींच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करत त्यांना शिक्षणासाठी काहीच कमी पडून दिले नाही. गरज पडल्यास त्यांनी दोघींच्या शिक्षणासाठी दुसऱ्यांकडून उधारी सुद्धा घेतली.
नाजिश अभ्यासात हुशार होती तिला चार्टर्ड अकाउंटंट (CA) किंवा बँकेत अधिकारी व्हायचे होते. पण 2016 मध्ये तिला तिच्या भावाकडून ऑनलाईन बिझनेसबद्दल माहिती मिळाली. तिच्या भावाने तिला येणाऱ्या काळात ऑनलाईन सेक्टरमध्ये बरीच वाढ होणार असून बरेच मार्केट ऑनलाईन शिफ्ट होणार आहेत. त्यामुळे आपण या क्षेत्रात काहीतरी केले पाहिजे असे सांगितले.
नाजिशने सांगितले की, ''सुरूवातीपासूनच घरामध्ये चप्पल आणि सँडेल्स तयार करायचो आणि स्वत:च्या मनाप्रमाणे त्याला डिझाइन करायचो. शेजारी राहणारी लोकं आमच्या क्रिएटिव्हिटीचे खूप कौतुक करायचे. आम्ही विचार केला की आपण याचा व्यवसायसुद्धा करू शकतो. यानंतर आम्ही कोल्हापुरी सँडेल्सवर क्रिएटिव्ह डिझाइन तयार करण्याचे काम सुरु केले कारण आपल्याकडे कोल्हापुरी चप्पल आणि सँडेल्सला चांगली मागणी आहे. मी आणि माझी छोटी बहीण इंशाने या कामाला सुरुवात केली.' पगार कपात केली; म्हणून बस कंडक्टरनं घर चालवण्यासाठी फेसबुकवर किडणी विकायची दिली जाहिरात
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार नाजिशने तिच्या आईकडून ३०० रुपये घेऊन मार्केटमधून एक सँडेल खरेदी केला. या सँडेलवर आपल्या मनाप्रमाणे क्रिएटिव्ह डिझाइन तयार केले. त्याच्या फॅब्रिकचा लूक बदलला आणि त्याचा फोटो काढून इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. फोटो पोस्ट केल्यानंतर एका महिन्यानंतर नाजिशला पहिली ऑर्डर मिळाली. त्यामुळे या दोन्ही बहिणींची हिंमत वाढली आणि त्यांनी हा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला.
सोशल मीडियावर 'Talking Toe' नावाचे स्वत:चे पेज तयार केले आणि त्यावर त्यांनी डिझाइन केलेले सँडेल्सचे फोटो पोस्ट केले. हळूहळू त्याचा व्यवसाय वाढत गेला. आता त्यांना अमेरिका, यूके, इटली, सिंगापूर, अमेरिका आणि मॉरिशसवरुन चपलांसाठी ऑर्डर येऊ लागल्या आहेत. शाब्बास पोरा! १० वीच्या मुलानं भंगारापासून बनवली इलेक्ट्रॉनिक बाईक, अन् वडील म्हणाले.....