(Image Credit : Inside Edition)
एखादी व्यक्ती मरण पावल्यावर जिवंत झाल्याचं तुम्ही सिनेमात पाहिलं असेल, पण प्रत्यक्षात असं काही नक्कीच बघायला मिळत नाही. पण अशी एक आश्चर्यकारक घटना प्रत्यक्षात घडली आहे. मिशिगनमध्ये एका २० वर्षीय तरूणाने मरणाला मात दिली आहे. रिपोर्टनुसार, मायकल प्रुइटला विजेचा झटका लागला होता आणि त्यामुळे त्याचा श्वास तब्बल २० मिनिटांसाठी बंद झाला होता. अशात डॉक्टरांनी त्याला पुन्हा विजेटे झटके देऊन जिवंत केलं.
टाइम्स नाऊ ने दिलेल्या रिपोर्टनुसार, मायकल प्रुइट त्याच्या परिवारासोबत टेलर या ठिकाणी राहतो. मायकल घरात त्याच्या सावत्र वडिलांसोबत काही काम करत होता. यावेळी तो एक धातु पायऱ्यांवरून घेऊन जात होता, अशात एका विजेच्या ताराचा स्पर्श झाला. त्याला विजेचा जोराचा झटका बसला.
(Image Credit : Fox News)
ही घटना घडताच घराच्या मालकाने पोलिसांना फोट केला आणि सीपीआर सुरू केला. पॅरामेडिक्स टीम जवळपास ४ तासांनी पोहोचली आणि रस्त्याने मायकलला डिफिब्रिलेटरचा वापर करून जिवंत करण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला. पण अॅम्बुलन्समध्ये त्याचं हृदय एकदाही धडधडलं नाही.
ब्यूमोंट हॉस्पिटलच्या डॉ. एंजल चुडलर यांनी सांगितले की, 'जेव्हा या तरूणाला हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं तेव्हा तो जिवंत असल्याचे कोणतेही संकेत मिळत नव्हते'.
हॉस्पिटलच्या अधिकारी बारबरा स्मिथ यांनी सांगितले की, 'पुन्हा जिवंत होण्यापूर्वी मायकल हा २० मिनिटांसाठी मृत होता. त्यांच्यासोबत जे घडलं ते खरंच चमत्कारीकच आहे. कारण मेंदुतील पेशी पाच मिनिटांपेक्षा कमी वेळेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मरायला लागतात. त्याला वेळीच सीपीआर देण्यात आल्याने त्यांच्या मेंदुला रक्तपुरवठा व्यवस्थित होत होता. त्याला पुन्हा शॉक देण्यासाठी त्याच्या पायांची बोटे आतून जाळण्यात आलीत'.