या तरूणीचं वय केवळ 21 वर्ष आहे आणि तिची कमाई 84 लाख रूपये आहे. इतक्या कमी वयात इतके पैसे कमावणं सगळ्यांसाठीच हैराण करणारं आहे. ही तरूणी सांगते की, तिनेही कधी विचार केला नव्हता की, इतक्या कमी वयात तिही इतकी कमाई करेल. तरूणीचं नाव तालेह जेन आहे. ती ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये राहणारी आहे. ती सांगते की, अनुभव वाढण्यासोबतच तिच्या पगारातही वाढ झाली. पण जे काम ती करते ते कुणाला करायला आवडणार नाही. कारण त्या कामात धोका जास्त असतो.
द सनच्या रिपोर्टनुसार, तालेह खाणींमध्ये टायर फिटर ट्रेनी म्हणून काम करते. हे एक फार घातक काम आहे. ती लागोपाठ 8 महिने नोकरी करते आणि 4 महिने सुट्ट्यांमध्ये घरी जाते. तिला वर्षाला 84 लाख रूपये मिळतात.
ती सांगते की, आम्हाला ट्रेनी म्हणूनही इतके पैसे दिले जातात कारण या कामात जीवाला धोका जास्त राहतो. मला अशा लोकांच्या आजूबाजूला राहणं आवडतं जे माझ्यासारखे त्याग करतात. जमिनीखाली 40 डिग्री तापमानात 12 तास लागोपाठ काम करावं लागतं. कधीही कोणत्या कार्यक्रमात जायला मिळत नाही.
तालेह असं काम करणारी एकटी टीनेजर नाहीये. 19 वर्षीय ब्रूस लॅंबही फ्यूनरल इंडस्ट्रीत काम करतो. त्याचे वडिलही तेच काम करत होते. तो स्कॉटलॅंडचा राहणारा आहे. त्यांच्यासमोर लोकांवर अंत्यसंस्कार होतात. तो म्हणाला की, मी खूप अंत्यसंस्कार पाहिले आणि याचा माझ्यावरही प्रभाव पडला. जेव्हा मी लहान होतो तेव्हा सगळं बघून हैराण व्हायचो. मला दु:खं समजून घेणं, अंत्यसंस्काराचा अनुभव घेणं, ही प्रक्रिया कशी शोकमध्ये असलेल्या लोकांना मदत करते, हे जाणून घेणं चांगलं वाटतं.