आजच्याच दिवशी देशातील सर्वात मोठ्या क्रांतिकारकाने देशासाठी आपला जीव गमावला होता. आजच्या दिवशीच स्वतंत्र सेनानी भगत सिंह (Bhagat Singh), सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी (Shaheed Diwas) देण्यात आली होती. भगत सिंह यांना माहीत होते की, देशासाठी त्यांना आपली जीव द्यावा लागेल. असे म्हणतात की, १ वर्ष आणि ३५० दिवस तुरूंगात राहिल्यानंतरही भगत सिंह हे आनंदी होते. ते या गोष्टीने आनंदी होते की, ते देशासाठी आपला जीव गमावत आहेत. जेव्हा तिघांनाही फाशी देण्याचा निर्णय झाला तेव्हा तुरूंगातील कैदी रडत होते.
एकीकडे भगत सिंह हे आनंदी होते तर दुसरीकडे देशात प्रदर्शन सुरू होते. लाहोरमध्ये मोठी गर्दी जमा झाली होती. इंग्रजांना माहीत होतं की, तिघांना फाशी देताना लोक रस्त्यावर येतील. त्यामुळे मिलिट्रीचा बंदोबस्त लावण्यात आला होता.देशात गोंधळ होऊ नये म्हणून भगत सिंह आणि त्यांच्या दोन साथिदारांना ठरलेल्या दिवसाच्या एक दिवसआधीच फासावर लटकवण्यात आले होते. तिघांनाही फाशी देण्यासाठी २४ मार्च हा दिवस ठरवण्यात आला होता. पण फाशी एक दिवसआधी देण्यात आली. सतलुज नदीच्या किनारी त्यांचे मृतदेह गपचूप नेण्यात आले होते.
ठरलेल्या वेळेआधी फाशी दिली जाणार होती. अशात फाशीची प्रक्रिया गुप्त ठेवण्यात आली होती. यावेळी फार कमी लोक उपस्थित होते. यात यूरोपचे डेप्युटी कमिश्नरही होते. जितेंदर सान्याल यांनी लिहिलेल्या 'भगत सिंह' नुसार, फाशी लावण्याच्या काही वेळेआधी भगत सिंहने डेप्युटी कमिश्नरकडे पाहिलं आणि हसत म्हणाले की, 'मिस्टर मॅजिस्ट्रेट, तुम्ही भाग्यशाली आहात की, तुम्हाला हे बघायला मिळत आहे की, भारताचे क्रांतिकारी कशाप्रकारे आपल्या आदर्शांसाठी फासावर चढतात'.
भगत सिंह यांना पुस्तके वाचण्याची फार आवड होती. त्यांचं पुस्तकांवरील प्रेम हैराण करणारं होतं. ते त्यांच्या जीवनाच्या अखेरपर्यंत नवनवीन पुस्तके वाचत राहिले. जेव्हाही ते पुस्तके वाचायचे तेव्हा नोट्स काढून ठेवायचे. तुरूंगातही त्यांनी अनेक पुस्तके वाचली.
जेव्हा त्यांना फाशी दिली जात होती तेव्हा ते लेनिनचं आत्मचरित्र वाचत होते. तुरूंगातील पोलिसांनी त्यांना सांगितले की, तुमच्या फाशीची वेळ झाली आहे. तेव्हा ते म्हणाले होते की, 'थांबा, आधी एका क्रांतिकारकाला दुसऱ्या क्रांतिकारकाशी भेटू द्या'. पुढील एक मिनिट ते पुस्तक वाचत राहिले. नंतर पुस्तक बंद करून ते छताकडे फेकलं आणि म्हणाले, आता ठिक आहे. चला'.
इंग्रज सरकार दिल्लीच्या असेम्बलीमध्ये पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल पास करणार होते. हे दोन्ही बिल असे होते ज्याने भारतीयांवर इंग्रजांचा दबाव आणखी वाढला असता. फायदा केवळ इंग्रजांचा होणार होता. याने चळवळही बंद पाडणंही शक्य होणार होतं. हे दोन बिल त्यांना पास करून घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी जमेल ते प्रयत्न केले होते.