23 वर्षीय एका तरूणीने 27 वर्षीय सावत्र भावासोबत लग्न केलं. महत्वाची बाब म्हणजे त्यांच्या पालकांनीही त्यांना समर्थन दिलं. तरूण आणि तरूणी आधीपासून एकमेकांना ओळखत होते. पण तेव्हा त्यांच्या भाऊ-बहिणीचं नातं नव्हतं. पण 2019 मध्ये जेव्हा तरूणीच्या आईने तरूणाच्या वडिलांसोबत लग्न केलं तेव्हा ते भाऊ-बहीण झाले.
मटिल्डा एरिकसनच्या आईने 2019 मध्ये सामुलीच्या वडिलांसोबत लग्न केलं होतं. मटिल्डा आणि सामुलीमध्ये आधीपासून ओळख होती. पण जेव्हा मटिल्डाची आई आणि सामुलीच्या वडिलांना एकमेकांसोबत लग्न केलं तर मटिल्डा आणि सामुली भाऊ-बहीण झाले.
या दोघांची भेट मटिल्डाच्या आईच्या 50व्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये झाली होती. त्यानंतर दोघेही प्रेमात पडले आणि पुढे जाऊन दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. कपलच्या या निर्णयाचा त्यांच्या पालकांनीही सपोर्ट केला.
Yahoo न्यूजसोबत बोलताना मटिल्डा एरिकसनने सांगितलं की, त्यांनी तोपर्यंत लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही जोपर्यंत ती सामुलीसोबत भेटली नव्हती. आईच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये भेट झाल्यावर काही आठवड्यांनी आम्ही डेटिंग सुरू केलं. हळूहळू आम्ही सोबत चांगला वेळ घालवला.
मटिल्डा म्हणाली की, आम्ही दोघे आधीही वेगवेगळ्या व्यक्तींसोबत लॉंग रिलेशनशिपमध्ये राहिलो होतो. पण कधी कुणासोबत असं वाटलं नाही. भेटल्यानंतर काही दिवसांनी हे वाटलं की, आम्ही नातं पुढे न्यायला हवं. पण नातेवाईक आणि मित्रांना हे ठीक वाटलं नाही. ते म्हणाले की, ज्या व्यक्तीला मी भाऊ म्हणते होते, त्याला आता बॉयफ्रेंडच्या रूपात कसं स्वीकारलं जाऊ शकतं.
पण मटिल्डाची ही समस्या दूर करण्यासाठी तिला तिच्या आईने मदत केली. तिने मटिल्डाला सूट दिली आणि सुमानीसोबत नवं नातं सुरू करण्याची परवानगी दिली. मटिल्डा म्हणाली की, तिची आणि सामुलीच्या वडिलांची हिच इच्छा होती की, त्यांनी सोबत रहावं.
मटिल्डा पुढे म्हणाली की, जर भविष्यात त्यांच्यासमोर काही कायदेशीर अडचण आली तर त्याचीही तयारी केली आहे. त्यामुळे आमच्या लग्नात काहीच अडचण येणार नाही.