Golden Kulfi Video : इंदुरमध्ये एका स्ट्रीट वेंडरने 'गोल्ड कुल्फी' नावाची एक कुल्फी विकणं सुरू केलं आहे. ज्याला लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही लोक ही कुल्फी खाण्यासाठी फारच उत्साहीत आहेत. तर काही लोकांनी ही पैशांची नासाडी आहे असं म्हटलं. ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी हे केलं असल्याचं मत काही लोकांनी व्यक्ती केलं. तसेच लोकांनी याच्या किंमतीवरूनही मते व्यक्त केली.
गोल्ड मॅन विकतोय सोन्याची कुल्फी
ही कुल्फी वेगवेगळ्या टेस्टमध्ये मिळते. सोशल मीडियावर नुकताच या कुल्फीचा व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यात या सोन्याच्या कुल्फीचं वेगळंच रूप दाखवण्यात आलं. तुम्ही बघू शकता की, एक ब्लॉगर दुकानदाराला विचारतो की, ही कुल्फी इतकी महाग का आहे? तर यावर त्याने सांगितलं की, या कुल्फीला सोन्याचा अर्क लावला जातो. त्यामुळे याची किंमत जास्त आहे.
इन्स्टावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या कैलाश सोनीने कॅप्शनला लिहिलं की, 'पता- प्रकाश कुल्फी, लोकेशन- सराफा बाजार, इंदौर, मध्य प्रदेश, इंडिया." या व्हिडिओत एक व्यक्ती सोन्याचे दागिने घालून एक कुल्फी काढतो आणि त्यावर 24 कॅरेट सोन्याचा अर्क लावतो. कैलाश सोनीनुसार, या सोन्याच्या कुल्फीची किंमत 351 रूपये आहे.