ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 19 - एका मद्यधुंद गाडीचालकानं तब्बल अडीच कोटी रुपयांची फेरारी नशेच्या धुनकीत अक्षरश: खड्ड्यात घातली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. KYUE ने दिलेल्या वृत्तानुसार 28 वर्षांचा जेम्स सिडनी अॅलन पहाटे अडीचच्या सुमारास 100 मैल प्रतितास वेगाने गाडी पळवत होता. नशेत असल्यामुळे एका वळणाचा त्याला अंदाज आला नाही, आणि गाडी 40 फूट खोल असलेल्या खड्ड्यात पडली. गाडीची पार दुर्दशा झाली असली तरी अॅलन एकदम सुखरूप असून त्याच्यावर दारू पिऊन गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेरारी ही दोन सीटर गाडी असली तरी आतमध्ये तिघे जण बसले होते. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. ही फेरारी 2015 ची स्पेशल एडिशन कार होती जिची किंमत 3.6 दशलक्ष डॉलर्स किंवा सुमारे अडीच कोटी रुपये आहे. कारची झालेली दुर्दशा बघून स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने कार हवेत उडवली तर वेगळं काय होणार, अशी मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे.
(फोटो सौजन्य www.kyue.com)