गेली दोन वर्षे कोरोना महासाथीचा परिणाम लग्नसोहळ्यांवरही झाला. कोरोना लॉकडाऊनमुळे निर्बंध आले. कुणाचं लग्न ठरवता आलं नाही. कुणाचं लग्न ठरलं, लग्नाची तारीखही ठरली पण निर्बंधांमुळे लग्न करता आलं नाही. कुणी आपलं लग्न पुढे ढकललं. कुणी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत, तर कुणी झूम-गुगल मीट असं ऑनलाइन पद्धतीने लग्न आटोपलं. २ वर्षे ही अशीच गेली. पण आता मात्र या दोन वर्षांतील लग्नाची कमतरता पुरेपूर भरून निघणार आहे (Wedding record).
लग्नासाठी आता लोक उतावळे झाले आहेत. दोन वर्षे प्रतीक्षा केली पण आता नाही, असं लग्नाच्या बाबतीच लोकांचं झालं आहे असंच चित्र दिसत आहे. कारण या वर्षात इतकी लगीनघाई झाली आहे की लग्नाचा नवा रेकॉर्डच होणार आहे. एकाच वर्षात तब्बल २६ लाख लग्न होणार आहे. अमेरिकेत या वर्षात लग्नाचा पूरच येणार आहे, असं म्हणायला हरकत नाही (26 Lakh marriage in one year).
अमेरिकेत २०२२ साली लग्नासाठी सर्वाधिक बुकिंग होत आहेत. 38 वर्षांनंतर लग्नाचा हा रेकॉर्ड पुन्हा होणार आहे. अमेरिकेत 1984 साली 26 लाख लग्न झाली होती. त्यावर्षी प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांचं लग्न झालं होतं. त्यांना लग्नबेडीत अडकलेलं पाहून लोकांनीही त्याचवर्षी लग्न करायला प्राधान्य दिलं. शिवाय त्यावर्षी एचआयव्हीची प्रकरणंही वाढली होती त्यामुळे लोक अनेक रिलेशनशिपमध्ये राहण्याऐवजी एकाच लाइफ पार्टनरसोबत राहत होते. त्यानंतर आता २०२२ साली म्हणजे जवळपास ३८ वर्षांनी पुन्हा असे रेकॉर्डब्रेक लग्न होणार आहेत.
गेल्या दोन वर्षांत लग्नसोहळ्यांचा आकडा कमी झाला होता. त्या दोन वर्षांतील लग्नाची कमतरता या वर्षात भरून निघणार आहे. कोरोना महासाथ बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. लोकांनी कोरोना लस घेतली आहे आणि आता मात्र लोक आपलं लग्न टाळण्याच्या पुढे ढतलण्याच्या विचारात बिलकुल नाही. त्यामुळे लग्नाचे वेन्यू, वेंडर, वेडिंग प्लॅनर सर्वकाही फूल बुक झालं आहे.
अमेरिकेत सामन्यपणे शनिवारी लग्न केलं जातं. पण यावर्षी लोक वर्किंग डे म्हणजे कामाच्या दिवसातही लग्न करायला तयार झाले आहेत. एका ऑनलाइन वेडिंग प्लॅनर कंपनीने लग्नाच्या तारखांवर सर्व्हेक्षण केलं. त्यानुसार आधीच्या तुलने यावर्षी वर्किंग डेला लग्न 11 टक्क्यांनी वाढली आहेत.