शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

2600 old mummy killed : तब्बल २६०० वर्षांआधी कुऱ्हाडीनं केली होती ममीची हत्या; समोर आला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 3:39 PM

2600 old mummy killed : मृत्यूच्यावेळी या महिलेचं वय २० ते ३० असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

इजिप्तचं नाव  घेतलं की सगळ्यात आधी आठवतं ते म्हणजे ममी. गेल्या अनेक वर्षांपासून इजिप्तमध्ये ममीनं स्वत;चं अस्तित्व टिकवून ठेवलं असून  या ममीबाबत नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींचा खुलासा होत असतो. काही दिवसांपूर्वी दीड  हजार वर्ष जुन्या पेटीत बंद असलेली ममी उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला होता. सध्या ममीबाबत अशीच एक माहिती समोर आली आहे. 

ममीला ताकाबुती ममी असं म्हणतात. ताकाबुती ममीविषयी महत्वाची माहिती समोरी आली आहे.  संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार ही एका महिलेची ममी असून पाठीत कुऱ्हाड घालून या महिलेची हत्या करण्यात आली होती. या ममीची हत्या चाकूनं करण्यात आली असावी असा खुलासा याआधीच्या संशोधनातून करण्यात आला होता. पण आता मात्र या ममीची हत्या कुऱ्हाडीनं  झाल्याचं समोर येत आहे.

कोविडबद्दल सुरू होती Zoom Meeting; अचानक नेत्याची बायको नग्नावस्थेत मागे उभी राहिली अन् मग....

इजिप्तमधल्या श्रीमंत कुटुंबातील ही महिला होती. आतापर्यंत तिच्या मृत्यूचं  रहस्य उलगडलेलं नाही.  १८३४ पासून या ममीवर संशोधन सुरू होतं. या संशोधनातून अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला. हत्या करण्यासाठी कुऱ्हाडीचा वापर करण्यात आला होता. मृत्यूच्यावेळी या महिलेचं वय २० ते ३० असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

अडीच हजार वर्ष जुन्या पेटीत बंद होती ममी

इजिप्तमधील मिस्त्र येथे पुरातत्व विभागातील कामगारांनी प्राचीन ममीची पेटी(Ancient Mummy Coffin) उघडली  होती. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला होता.  या वर्षाच्या सुरूवातील ५६ बंद पेट्या सापडल्या होत्या. त्यातील १२ पेक्षा जास्त पेट्या या साककारा मध्ये उघडण्यात आल्या होत्या. साककारा मिस्त्र येथिल विशाल, प्राचीन दफन मैदान आहे. 

आजार राहूदे पण इंजेक्शन आवर! लस घेताना आजींनी दिली भयानक रिएक्शन, पाहा व्हिडीओ

मिस्त्र पर्यटन आणि पुरातत्व मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार साककाराच्या पुरातत्व क्षेत्रात दफन विहिरांमध्ये ५९  लाकड्याचा पेट्यांचा शोध घेण्यात आला होता. लाकडाच्या पेट्या चांगल्या स्थितीत होत्या. या पेट्यांमध्ये  प्रतिष्ठीत आणि वरिष्ठ लोकांच्या मृतदेहांचा समावेश होता. शनिवारी एक पेटी (Ancient Mummy Coffin) पहिल्यांदा उघड्यात आली होती. जवळपास २ हजार ५०० वर्षांपूर्वी ही पेटीबंद करण्यात आली होती. पर्यटन आणि पुरातत्व मंत्रालयाकडून याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओत एक ममी होती. एका  दफन कापडात गुंडाळून ठेवण्यात आला होती.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके