म्यानमार देश तुम्हाला माहीतच असेल, म्यानमारचे जुनं नाव बर्मा होतं. हे नाव इथल्या बर्मी जातीवरून पडलं आहे. याचं मुळ नाव मयन्मा असं आहे. बर्मी भाषेत र चा उच्चार य ने केला जातो. म्यानमार बौध्द बहूल देश आहे. या देशात जवळपास ९० टक्के लोकसंख्या बौध्द धर्मीय आहे. म्यानमार दक्षिण पूर्व आशियातील सगळ्यात मोठा देश आहे.
या ठिकाणी एक प्राचीन शहर आहे. हे शहर तेराव्या शतकात पनोग साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिध्द होतं. याच कालावधीत इथं ४ हजारांपेक्षा जास्त बौध्द मंदिरं आणि मठांची स्थापना करण्यात आली होती. त्यातील ३ हजार ८२२ मंदिरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत.
म्यानमारचे 'श्वेडागोन' पॅगोडा या ठिकाणचे सगळ्यात महत्वपूर्ण आणि प्रसिध्द आहेत. पॅगोडा हे बहूमजली इमारतीप्रमाणे असतात. तुमचा विश्वास बसणार नाही पण या पॅगोडावर तयार करण्यात आलेल्या मुकुटावर ५ हजारापेक्षा जास्त हिरे आहेत. इतकंच नाही तर २ हजारांपेक्षा जास्त रत्न आहेत.
सगळ्यात पुरातन वास्तूपैकी ही वास्तू आहे. या मंदिराला २ हजार ६०० वर्ष जुना इतिहास असल्याचं सांगितलं जातं. परंतू हे मंदिर कधी तयार करण्यात आलं याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही. पारंपरिक सौम्य व शांत स्वभावाचे म्यानमारचे रहिवासी आहेत. तसंच आदरातिथ्य दाखवणारे आहेत.
म्यानमारची सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या ठिकाणी पडाउंह जातीच्या महिला आपली मान सुंदर आणि लांब दिसावी यासाठी वयाच्या ५ व्या वर्षापासून गळ्यात आणि मानेत धातूच्या बांगड्या घालतात. म्यानमारमधील लोक, रेशीम विणण्यात, हाताने दागदागिने बनवण्यात व लाकडावर कोरीव काम करण्यात किती माहीर आहेत. या ठिकाणी सागवान आणि इतर लाकडांपासून मानवांच्या, वाघांच्या, घोड्यांच्या, गव्यांच्या आणि हत्तींच्या सुबक मूर्ती बनवल्या जातात.
(image credit- bloomberg)
या देशातील अनेक गोष्टी तुम्हाला माहीतही नसतील, या देशात गर्भवती महिलांना केळं आणि मिरची खायला दिली जाते. या प्रथेमागे कारणं सुद्धा आहे. केळं खाल्याने बाळाची वाढ होऊन आकार व्यवस्थित राहतो. असं तिथले लोक मानतात.