सध्याच्या ऑनलाईन जगतात अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेम जुळले जाते. अलीकडेच सीमा हैदर, अंजू मीणा यासारखी प्रकरणे आपल्यासमोर आलीत. आता एका २८ वर्षीय मुलीने तिची लव्हस्टोरी शेअर केली आहे. ज्यात तिने तिच्या वयाच्या ४२ वर्ष मोठ्या परदेशी व्यक्तीला तिचं हृदय दिले आहे. काही दिवसांच्या मुलाखतीनंतर दोघांनी डेटवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लग्नही केले. परंतु या रिलेशनशिपवरून आता तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. पैशांच्या लालसेपोटी तिने ७० वर्षीय व्यक्तीशी लग्न केले असं नेटिझन्स म्हणतात. पण आमचे प्रेम खरे आहे. आम्ही आयुष्यात खूप सुखी आहोत असं या कपलने म्हटलं आहे.
ही कहाणी आहे २८ वर्षीय जॅकी आणि ७० वर्षीय डेविडची. २०१६ मध्ये दोघांची सोशल मीडियावर भेट झाली. हळूहळू त्यांची मैत्री झाली त्यानंतर भेटीचा सिलसिला सुरू झाला. मुलाखतीनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. चॅटनंतर अवघ्या ३ महिन्यात जॅकीला भेटण्यासाठी डेविड अमेरिकेतील फिलिपिंस इथं पोहचले. इथं दोघे एकत्र राहिले. दोघांमधील जवळीक वाढली. त्यानंतर दर २ महिन्यांनी डेविड फिलिपिंसला जात होते. अखेर २०१८ मध्ये दोघांनी ल्ग्न केले आणि जॅकी कॅलिफोर्नियाच्या ओकलँड येथे शिफ्ट झाली.
इतकेच नाही तर जॅकी आणि डेविडने कोरोना लॉकडाऊनदरम्यान एक टिकटॉक अकाऊंट बनवले. त्यावर ती त्यांच्या आयुष्याशी निगडीत घटना शेअर करू लागली. त्यांच्या अकाऊंटला ५० हजाराहून अधिक फोलोअर्स आहेत. युजर्स त्यांच्या पोस्टला लाईक्स आणि कमेंट्स करत असतात. कुणी जॅकीला लालची म्हटलं तर डेविडलाही ट्रोल करतात. परंतु दोघे कपल नेटिझन्सच्या नकारात्मक कमेट्सकडे दुर्लक्ष करतात.
डेविड म्हणाले की, जर २ जण एकमेकांवर प्रेम करत आहेत. एकत्र आयुष्य घालवत आहेत तर त्यांच्या वय आडवे येत नाही. लोकांनी वयावरून त्रास द्यायला नको. आम्ही दोघे एकत्रित आनंदी आहोत असं त्यांनी सांगितले तर डेविड खूप साधा, सरळ आहे. चांगल्या स्वभावाचा आहे. तो माझा आदर करतो त्याहून जास्त तो प्रेम करतो. मला डेविडसोबत लग्न केल्याचा कुठलाही पश्चाताप नाही असं जॅकीने म्हटलं. एका युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत डेविडने तो निवृत्त झाल्याचे सांगत जॅकी जॉब करते असं म्हटलं. जॅकीच्या लग्नाला तिचे घरचे आले नाहीत परंतु त्यांचा लग्नाला पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितले.