क्यूबाचे(Cuba) दोन पुरूष आणि एक महिला ३३ दिवस बाहामासच्या (Bahamas Island) एका निर्जन बेटावर फसले(Cast Away) होते. या बेटावर त्यांना खाण्यासाठी नारळांशिवाय काहीच नव्हतं. रिपोर्ट्सनुसार, या लोकांना यूएस कोस्ट गार्डने(US coast Guard) ९ फेब्रुवारीला या बेटावरून सुरक्षित बाहेर काढले. हे लोक गेल्या १ महिन्यांपासून एंग्युएला नावाच्या बेटावर अडकून बसले होते.
झालं असं की, यूएस कोस्ट गार्डचं हेलिकॉप्टर या भागात रूटीन फेरफटका मारत होतं. तेव्हाच एअरक्राफ्टमध्ये बसलेल्या पायलटची नजर एका फडफडत्या झेंड्यावर पडली. पायलटला जाणीव झाली की, तिथे असलेल्या लोकांना मदतीची गरज आहे. यूएस कोस्ट गार्डने या बेटावरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात त्या लोकांनी त्यांचा मेकशिफ्ट कॅम्पही दिसत आहे.
त्यानंतर कोस्ट गार्डच्या सदस्यांनी खाण्याचे पॅकेट्स आणि पाणी हेलिकॉप्टरमधून खाली फेकले. त्यासोबत त्यांनी एक रेडिओही खाली टाकला. जेणेकरून त्यांच्या कम्युनिकेशन व्हावं. हे तीन लोक ८ फेब्रुवारीला या बेटावर आढळून आले होते. पण खराब वातावरणामुळे त्यांना रेस्क्यू करण्यासाठी दुसरा दिवस उगवावा लागला.
या लोकांना तेथून बाहेर काढल्यावर फ्लोरिडातील मेडिकल सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. यातील कुणालाही जखम झालेली नाही. या प्रकरणात प्रशासनाने सांगितलं की, या लोकांची बोट पलटी झाली होती. ज्यानंतर तिघेही स्वीमिंग करून बेटावर पोहोचले होते. मात्र तिघांनीही हिंमत सोडली नाही. ३३ दिवसांपर्यंत ते नारळं आणि उंदीर खाऊन जिवंत राहिले.
कोस्ट गार्ड लेफ्टिनंट जस्टिनने एनबीसी १२ सोबत बोलताना सांगितले होते की, पायलटने काही विचित्र झेंडे पाहिले होते. यात अनेक कलर्स होते. याच कारणामुळे ते आधी थोडे हैराण झाले होते. जेव्हा त्यांनी लक्ष देऊन पाहिलं तर ते लोक यांना सिग्नल देत होते. जस्टिन म्हणाला की, एक महिन्यानंतरही हे लोक चांगल्या शेपमध्ये होते.