कोणत्याही पुरूष आणि महिलेच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे लग्न. दोन लोक लग्नाच्या माध्यमातून आपलं पूर्ण आयुष्य एकमेकांसोबत घालवण्याचा निर्णय घेतात. लग्नानंतर आपापलं वेगळं आयुष्य जगणारे दोन लोक एका छताखाली राहतात. एकाच रूममध्ये झोपतात. पण जर हे लोक लग्न होऊनही वेगवेगळ्या रूममध्ये झोपू लागले तर असं समजलं जातं की, त्यांचं काहीतरी बिनसलं आहे. किंवा मग त्यांच्यात काही वाद झाला आहे. पण जपानमध्ये पती-पत्नी हे नेहमीच वेगळ्या रूममध्ये झोपतात. चला जाणून घेऊ याचं कारण...
जर तुम्हाला असं वाटत असेल की, जपानमधील कपल्सचं एकमेकांवर प्रेम नसतं, तर तुम्ही चुकीचा विचार करताय. जपानी लोक आपसात प्रेम असूनही रात्री सोबत झोपत नाहीत. याचा अर्थ असा नाही की, त्यांचं नातं कमजोर असतं किंवा लवकरच दोघे वेगळे होणार आहे. उलट नातं आणखी मजबूत करण्यासाठी कपल असं करतं. आज आम्ही याची तीन मुख्य कारण सांगणार आहोत.
झोपण्याची आणि उठण्याची वेगवेगळी वेळ
जपानमधील कपल एकमेकांच्या चांगल्या झोपेची खूप काळजी घेतात. जर दोघांपैकी एकाला लवकर उठायचं असेल तर दुसरा त्याची झोप खराब करत नाही. अशात दोघेही वेगवेगळे झोपून एकमेकांना पुरेशी झोप घेण्यासाठी वेळ देतात. त्यांना हे माहीत आहे की, एक चांगली झोप शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी गरजेची आहे.
लहान मुलं आईसोबत झोपतात
जपानमध्ये लहान मुलं आईसोबत झोपतात. याबाबत असं मानलं जातं की, आईचा अचानक मृत्यू होणाचा धोका याने कमी केला जाऊ शकतो. सोबत लहान मुलांच्या हृदयाची धडधडही याने रेगुलेट होते. वडील स्वत: ठरवू शकतात की, तो पत्नी आणि मुलांसोबत झोपणार की, वेगळा. पण याने दोघांचीही झोप खराब होणार नाही याची काळजी घेतली जाते.
वेगळं झोपणं म्हणजे शांती
जपानमध्ये वेगळं झोपणं म्हणजे शांती आहे. भलेही जगातील लोकांना हे वाटत असेल की, वेगळं झोपणं म्हणजे त्यांच्यात प्रेम नाही. पण जपानमध्ये याला चांगल्या झोपेसोबत जोडून बघतात. याच कारणाने ते वेगवेगळे झोपतात.