आजपासून कोट्यावधी वर्षाआधी पृथ्वीवर डायनासॉर राज्य करत होते. नंतर हे विशाल जीव नष्ट झाले. आता डायनासॉरच्या कथा केवळ सिनेमे आणि पुस्तकात बघायला वाचायला मिळतात. डायनासॉर नष्ट होऊन बरीच वर्ष झाली आहेत. पण वैज्ञानिक या जीवांबाबत नेहमची आश्चर्यजनक खुलासे करतात. अशात पृथ्वीवर विशाल डायनासॉरच्या अस्तित्वासंबंधी एक मोठा शोध समोर आला आहे.
अर्जेंटिनामध्ये डायनासॉरचे १०० पेक्षा जास्त अंडी सापडले होते. यानंतर आता यूरोपीय देश स्पेनमध्ये विशाल डायनासॉर 'टाइटनोसॉर' च्या एका घरट्यात ३० अंडी सुरक्षित सापडली आहेत. या शोधानंतर सगळेजण हैराण झाले आहेत. पुरातत्ववाद्यांनी ही अंडी उत्तर स्पेनच्या लोआरेमध्ये खोदकाम करताना दोन टन वजनी डोंगराआतून काढले आहेत.
रिपोर्टनुसार ही अंडी सप्टेंबर महिन्यात सापडली होती. पण याचा खुलासा आता केला गेला आहे. टाइटनोसॉरची ३० अंडी सापडल्यावर वैज्ञानिकांचं मत आहे की, अजूनही ७० अंडी त्या दगडाखाली दबलेली असू शकतात. टाइटनोसॉर लांब मान असलेले डायनासॉर होते, जे साधारण ६.६ कोटी वर्षाआधी नष्ट झाले होते. एका माहितीनुसार या जीवांची शेपटी ६६ फूटापर्यंत लांब असायची.
हे खोदकाम यूनिव्हर्सिटी ऑफ जारागोजातील टिमने आणि नोवा यूनिव्हर्सिटी लिस्बनसोबत मिळून केलं होतं. नोवा यूनिव्हर्सिटीचे मोरेनो अजांजा यांच्यानुसार, दगडातून साधारण ३० अंडी सापडली. २०२१ करण्यात आलेल्या मोहिमेचा उद्देश एका विशार घरट्याला काढणं हा होता. ही अंडी एका दगडाखाली दबली होती, ज्याचं वजन दोन टन होतं.
अजांजाने सांगितलं की, एकूण ५ लोकांच्या टीमने साधारण ५० दिवस खोदकाम केलं. ते रोज ८ तास खोदकाम करायचे. त्यानंतर डायनासॉरचं घरटं काढता आलं. ते म्हणाले की, अशाप्रकारे विशाल दगड काढणं फार अवघड असतं. या अंड्यात जीव तयार झाले होते.