धक्कादायक! विधवा महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता तरूण, आता न राहिला पुरूष ना स्त्री; वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 12:38 PM2022-02-12T12:38:23+5:302022-02-12T12:38:51+5:30
Shocking love story : तरूणाने आई-वडिलांना सांगितलं की, त्याच्या ऑफिसमध्ये त्याची एका विधवा महिलेसोबत भेट झाली. तो तिच्या प्रेमात पडला. महिलेच्या पतीचा दोन वर्षाआधी कोरोनामुळे मृत्यू झाला.
मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमधून (Bhopal) एक अजब घटना समोर आली आहे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करणारा एक तरूण प्रेमात पडून ना पुरूष राहिला ना महिला. तो एका लहान मुलीच्या विधवा आईच्या प्रेमात पडला (shocking love story) आणि तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पण महिलेने लग्नास नकार दिला. मात्र, त्याला कोणत्याही स्थितीत महिलेसोबत रहायचं होतं. त्यामुळे त्याने जेंडर चेन्ज (Sex Change) करण्याचा निर्णय घेतला. काउन्सेलिंगनंतर आता त्याने ही ट्रिटमेंट मधेच रोखली आहे.
news18.com च्या वृत्तानुसार, ३२ वर्षीय तरूण एका श्रीमंत घरातील आहे. त्याचे वडील मोठी अधिकारी आहेत. तो दिल्लीत नोकरी करतो. आई-वडिलांच्या लक्षात आलं की, आपल्या मुलाचं वागणं बदललं आहे. तो ट्रिटमेंट घेत असल्याने त्याच्या हार्मोन्समध्ये बदल होत होता. तो चिडचिड करत होता. एकटा राहत होता. त्यानंतर ते मुलासोबत बोलले आणि तेव्हा या घटनेचा खुलासा झाला.
तरूणाने आई-वडिलांना सांगितलं की, त्याच्या ऑफिसमध्ये त्याची एका विधवा महिलेसोबत भेट झाली. तो तिच्या प्रेमात पडला. महिलेच्या पतीचा दोन वर्षाआधी कोरोनामुळे मृत्यू झाला. तिला एक मुलगीही आहे. त्याने तिला लग्नासाठी विचारलं तर तिने नकार दिली. त्यानंतर तो तिला म्हणाला की, कोणत्याही स्थितीत त्याला तिच्यासोबत रहायचं आहे. तिचा मदत करायची आहे. तरूण तिला म्हणाला की, जर ती त्याला पुरूष म्हणून स्वीकारू शकत नाही तर तो जेंडर चेन्ज करेल आणि महिला बनून तिच्यासोबत राहील. इतकंच नाही तर त्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने जेंडर चेन्जची ट्रिटमेंट सुरू केली.
मुलाची ही अवस्था पाहून त्याच्या आई-वडिलांनी त्याची काउन्सेलिंग करण्याचा निर्णय घेतला. विधवा महिलेनेही त्याला समजावलं. हे प्रकरण नंतर अॅडव्होकेट आणि काउन्सेलर सरिता राजानीकडे गेलं. राजानी यांनी सांगितलं की, तरूण आणि महिलेची काउन्सेलिंग केली गेली. तरूणाची जेंडर चेन्जची ट्रिटमेंट रोखण्यात आली.
त्यांनी सांगितलं की, महिलेने तरूणाला सांगितलं होतं की, ती आता कोणत्याही दुसऱ्या पुरूषाला पतीच्या रूपात स्वीकारू शकत नाही. त्यानंतरही त्याने तिचा नाद सोडला नाही आणि त्याला तिची शक्य ती मदत करायची होती. तरूणाने निर्णय घेतला होता की, जेंडर चेन्ज केल्यानंतर तो महिलेसोबत राहील. सध्या काउन्सेलिंग सुरू आहे.