शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

३५ हजार मच्छीमार कुटुंबांना दिलासा

By admin | Published: June 02, 2015 2:15 AM

मेरीटाइम बोर्ड तसेच मत्स्य विभागाने पर्ससीन वा मिनी पर्ससीन नेटच्या साहाय्याने मासेमारी करणाऱ्या कोणत्याही बोटधारकाला तसेच बार्जेस व स्टॉलधारकांना

अलिबाग : मेरीटाइम बोर्ड तसेच मत्स्य विभागाने पर्ससीन वा मिनी पर्ससीन नेटच्या साहाय्याने मासेमारी करणाऱ्या कोणत्याही बोटधारकाला तसेच बार्जेस व स्टॉलधारकांना मासेमारी करण्याचा परवाना देऊ नये, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या न्या. विकास किनगांवकर व डॉ. अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने पारित केले आहेत. यामुळे अन्यायग्रस्त सुमारे ३५ हजार पारंपरिक मच्छीमार कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.पुण्यातील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात २८ मेला सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजीवी रापण मच्छीमार संघाने दाखल केलेल्या पर्यावरणहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान अ‍ॅड. असीम सरोदे यांनी पारंपरिक मच्छीमार समाजाची बाजू मांडली. पर्ससीन आणि मिनी पर्ससीन, रिंगसीन नेटधारकांकडून पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाप्रमाणेच समुद्री जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जलचर संपत्तीची नासधूस होतानाच पारंपरिक रापण पद्धतीने मासेमारी करणाऱ्या सुमारे ३५ हजार मच्छीमार समाजबांधवांना जीवन जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत, याकडे लक्ष वेधून त्वरित तात्पुरत्या स्वरूपाचे आदेश पर्ससीन व मिनी पर्ससीन, रिंगसीन नेटधारकांविरोधात पारित करावे, अशी आग्रही मागणी अ‍ॅड. सरोदे यांनी केली. पर्ससीन व मिनी पर्ससीन, रिंगसीन नेटधारकांच्या बाबतचा प्रश्न गेल्या तीन दशकांपासून सुरू असून, आता तो राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात पोहोचला आहे. १६ मि.मी. पर्ससीन आणि मिनी पर्ससीन, रिंगसीन नेटच्या माध्यमातून समुद्रातील मासळी पकडली जात असल्याने निर्माण होणारी मोठी आर्थिक विषमता, समुद्रात जीवघेणा संघर्ष, किनारी भागात मारामाऱ्या, आंदोलने झाली. या पर्ससीन व मिनी पर्ससीन, रिंगसीन नेट मासेमारीने होणारे जैवविविधतेचे नुकसान, मत्स्य प्रजोत्पादनावर होणारा विपरीत परिणाम, सागरी तटरक्षक दलाचा नाकर्तेपणा, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा असंवेदनशील दृष्टिकोन या बाबी हरित न्यायाधिकरणासमोर मांडण्यात येत असल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (विशेष प्रतिनिधी)