तुम्ही कधी पाहिले असेल रस्त्यावरून जाताना एकेठिकाणी कचऱ्याचा ढीग पडलेला असतो. मात्र मोजकेच पर्यावरण प्रेमी काही विचार न करता रस्त्यावरील घाण बाजूला करून परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक महिला आहे मारिया क्लटरबक, जी दररोज रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी फेकलेला कचरा उचलून कचरापेटीत टाकते. अलीकडेच त्यांना रस्त्यावर २ कापडी पिशव्या पडलेल्या दिसल्या. जेव्हा मारिया यांनी या पिशव्या उघडल्या तेव्हा आतमधील दृश्य पाहून पायाखालची जमीनच सरकली.
५४ वर्षीय मारिया इंग्लंडच्या ग्लूसेस्टर हक्कलकोट इथं राहते. त्यांनी सांगितले की, मी दररोज रस्त्यावरील कचरा उचलण्याचं काम करते. गुड फ्रायडेच्या दिवशी रात्री ९ वाजता मला रस्त्याशेजारी २ पिशव्या सापडल्या. सुरुवातीला रस्त्याचे काम सुरू आहे त्यांच्या रेतीची गोणी असेल असं मला वाटले. परंतु मी जसं पुढे गेले तसे जोरात आवाज आला. त्या पिशवीत काहीतरी होते ज्याला केबलने बांधलेले. आतमध्ये काही जिवंत आहे अशी जाणीव त्यांना झाला. मांजर नाहीतर कुत्रा असावा असं मारिया यांना वाटले.
परंतु मारिया यांनी पिशवीला बांधलेली तार उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आतील दृश्य पाहून त्या हादरल्या. त्यात ४ जिवंत अजगर होते. साप पाहून मारिया यांनी तातडीने पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी पिशवीत पाहिले तेव्हा त्यातून अजगर बाहेर आले. त्या रात्री ४ डिग्री तापमान होते. जर वेळीच अजगरांना पाहिले नसते तर ते थंडीने मृत पावले असते असं मारिया यांनी म्हटलं.