आपण रोज अनेक वस्तू वापरतो त्यातील वस्तूंवर अनेक अशी चिन्ह किंवा खूणा करण्यात आलेल्या असतात. पण त्या खूणा किंवा चिन्ह कशासाठी आहेत? हे आपल्याला माहीत नसतं किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण त्या वस्तूंवर देण्यात आलेल्या या खूणा आपल्या उपयोगासाठीच असतात. जाणून घेऊयात अशा काही वस्तूंबाबत ज्यावर असणाऱ्या अनेक खुणांचा उपयोग आपल्याला माहीत नसतो.
1. हेडफोन जॅकवर असणाऱ्या लाईन्स
आपल्या हेडफोन जॅकवर दोन किंवा तीन लाईन्स असतात. हेडफोन्सच्या दोन वेगवेगळ्या स्पिकर्स आणि माइक यांमध्ये योग्य पद्धतीने करंट पास होण्यासाठी हे सर्कीट डिझाइन तयार करण्यात आलेलं असतं. जर हे डिझाइन नसेल तर तुमच्या हेडफोनच्या एकच स्पिकरमधून आवाज येतो.
2. आयफोनमध्ये कॅमेरा आणि फ्लॅशमध्ये असलेलं छिद्र
आयफोनचा कॅमेरा आणि फ्लॅशमध्ये एक छिद्र असतं पण फार कमी लोकांना ते कशासाठी असतं ते ठाऊक असेल. हे छिद्र नसून एक मायक्रोफोन असतो. जेव्हा तुम्ही व्हिडीओ शूट करता त्यावेळी त्यामध्ये आवाज व्यवस्थित रेकॉर्ड व्हावा म्हणून तो मायक्रोफोन देण्यात आलेला असतो.
3. कम्प्युटरच्या किबोर्डवरील F आणि J किजवर असलेल्या रेषा
कम्प्युटरच्या किबोर्डवर F आणि J या दोन किजवर छोट्या रेषा देण्यात आलेल्या असतात. जेव्हा तुम्ही किबोर्डवर टायपिंग करता तेव्हा तुम्ही टायपिंगसाठी हाताची सर्व बोटं वापरणं गरजेचं असतं. या दोन रेषांची टायपिंग करताना मदत होते. यामुळे तुम्हाला योग्य बटणांचा अंदाज घेणं शक्य होतं.
4. पॅन्टवर असलेली घडी
आपण पॅन्टला इस्त्री करताना नेहमी ही घडी मारतो. पण ही घडी कशासाठी असते याचा विचार कधीच केला नाही. ही घडी 19व्या शतकापासून मारण्यात येते. त्यावेळी कंपन्यांचा असा प्रयत्न असे की जास्तीत जास्त कपडे एक्सपोर्ट करता यावे. अशावेळी कपड्यांच्या घड्या घातल्या जात असतं. तेव्हापासून पॅन्टवर ती घडी पडली गेली. तिला क्रिझ असंही म्हटलं जातं.