डेट्रॉईट : मिशिगन येथे राहणाऱ्या १५ वर्षांच्या मुलाने सेलेब्रल पाल्सी झालेल्या आपल्या छोट्या भावाला पाठीवर घेऊन तीन दिवसात ५७ मैल चालण्याचा उपक्रम पूर्ण केला असून, सेरेब्रल पाल्सी या व्याधीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण ही मोहीम काढल्याचा दावा केला आहे. अमेरिकेत सर्वत्र ही बातमी हेडलाईन म्हणून झळकली आहे. हंटर गंदी असे या मुलाचे नाव असून, त्याचा धाकटा भाऊ ब्रेडन हा सेरेब्रल पाल्सी व्याधीने ग्रस्त आहे. दोघा भावांनी शुक्रवारी लंबरव्हिले येथील आपले घर सोडले व ओहिओ सीमेवरून चालणे सुरू केले. रविवारी सायंकाळी ४ वाजता ते अॅन आर्बर येथे मिशिगन विद्यापीठापर्यंत पोहोचले. त्यांच्या उपक्रमातील अखेरच्या टप्प्याला मित्र व कुटुंबीय जमले होते. या भावांचा हा असा दुसरा उपक्रम आहे. (वृत्तसंस्था)
भावाला पाठीवर घेऊन ५७ मैलांचा प्रवास
By admin | Published: June 09, 2015 12:41 AM