जगभरात अनेक प्रकारच्या विचित्र गोष्टींचा शोध सुरूच राहतो. यातील काही शोधांसाठी टीम तयार केल्या जातात तर काही वस्तू तर अचानक अशाच सापडतात. यूनायटेड स्टेस्ट्सच्या मिशिगनमध्ये एका ६ वर्षाच्या मुलाने १२ हजार वर्ष जुन्या अशा जीवाचा शोध लावला जे जीव आता लुप्त झाले आहेत.
हा शोध ६ वर्षीय ज्यूलियन गॅंगनोने मिशिगनमध्ये केला. ज्यूलियन इथे वडिलांसोबत डायनासोर हिल नेचर प्रिझर्वमध्ये फिरायला गेला होता. ही घटना गेल्या महिन्यातील आहे. ज्यूलिअन आपल्या फॅमिलीसोबत रिझर्वमध्ये गेला होता. तेव्हा त्याला फिरता फिरता एक दगडाचा तुकडा सापडला. जेव्हा वडिलांना ज्यूलिअनच्या हातात हा दगड दिसला तर त्यांना तो दगड काहीतरी वेगळंच वाटला. मुळात हा दगड काही सामान्य नव्हता. तो दगड नव्हताच तो होता मास्टोडोन्स नावाच्या प्राण्यांचा दात. हे प्राणी १२ हजार वर्षापूर्वी जमिनीवर होते.
मास्टोडोन्स आजपासून १२ हजार वर्षाआधी नॉर्थ आणि सेंट्रल अमेरिकेत फिरत होते. हजारो वर्षाआधी हे प्राणी पृथ्वीवरून अचानक गायब झाले होते. मास्टोडोन्स आजच्या हत्तींसारखे दिसत होते. त्यांची उंची ९ फूट ५ इंच होती. त्यासोबतच त्यांचं वजन ११ टनच्या आसपास असलं असेल. ज्यलियनच्या हातात त्याच मास्टोडोन्सचा जबडा लागला होता. त्याला वाटलं होतं की, हा एखाद्या ड्रॅगनचा दात असेल. पण मुळात तो मास्टोडोन्सचा दात होता.
ज्यूलियनच्या परिवाराने हा दात एका म्युझिअमला दान केला आहे. म्युझिअमच्या गाइडने सांगितलं की, इतके वर्ष जुना फॉसिल इतक्या चांगल्या स्थितीत पाहून कुणालाही विश्वास बसणार नाही. ज्यूलिअनला पुढे जाऊन संशोधक व्हायचं आहे. एक्सपर्ट म्हणाले की, हा शोध फारच दुर्मीळ आहे.