60 वर्षाचा अशरफ अली 20 वर्षाच्या तरूणीवर मन हरलं. नंतर दोघांनी लग्नही केलं. सुरूवातीला अंबरच्या परिवाराने अशऱफच्या वयावरून लग्नास नकार दिला होता. पण नंतर दोघांच्या लव्हस्टोरीचा विजय झाला. अशरफ आणि अंबरची लव्हस्टोरीचा व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल झाली आहे.
पाकिस्तानात लग्न झालेल्या या कपलच्या वयात 40 वर्षाचं अंतर आहे. 60 वर्षाचा अशरफ अलीचं कॉस्मेटिकचं दुकान होतं. जे कोरोना काळात बंद झालं. याच दुकानावर अंबर लिपस्टिक, पावडर, परफ्यूम, आयलायनर खरेदी करत होती. अशरफनुसार, ती दुकानावर आली तेव्हा मला ती आवडली. त्यानंतर सिलसिला पुढे गेला.
अंबरने सांगितलं की, अशरफच्या दुकानावर ज्या वस्तू मिळत होत्या, त्यांची क्वालिटी चांगली होती. दुकानावर भेट होत असताना त्यांच्यातील संवाद वाढला. नातं घट्ट झालं.
अशरफने सांगितलं की, सगळ्या भावा-बहिणींमध्ये तो मोठा आहे. त्यांची लग्नेही त्यानेच केली. पण त्याचं लग्न व्हायचं राहिलं होतं. यादरम्यान अंबर दुकानावर आली तर त्याला ती आवडली. अंबरने अशरफ अलीला लग्नासाठी विचारलं. अंबरचा हा स्वीकार त्यालाही आवडला. तो म्हणाला की, ही फार मोठी गोष्ट होती.
अशरफ अलीला जेव्हा दोघांतील वयाच्या अंतराबाबत विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला की, मनं जुळतात तेव्हा इतर गोष्टी महत्वाच्या राहत नाहीत. लोकांना वेगळं वाटू शकतं. मन जुळण्याला वयाचं बंधन नसतं.
वयाबाबत अंबर म्हणाली की, मन जुळण्यासाठी वयाचं बंधन नसतं. मला त्यांचं वागणं फार आवडलं. वयाचं काय आहे? त्यांच्यासारखा माणूस मला कधीच भेटला नसता. अंबर म्हणाली की, घरातील अनेक लोक या नात्याच्या विरोधात होते. पण आम्हाला एक होण्यापासून कुणी रोखू शकत नव्हतं. अशरफ अलीने सांगितलं की, घरातील सगळे लोक याविरोधात होते. अंबरने अशरफ यांचं पती म्हणून खूप कौतुक केलं. अंबर म्हणाली की, ती त्यांच्या सगळ्या गोष्टींची काळजी घेते.