आपल्या आयुष्यात आपला एक चांगला जोडीदार (Find life partner) मिळावा असं आपल्याला वाटतं. त्यासाठी आपण आपल्या ओळखीच्या, जवळच्या व्यक्तीमध्ये असा जोडीदार शोधतो किंवा डेटिंग अॅपची मदत घेतो. लग्न करायचं असेल तर मॅट्रिमोनिअल वेबसाईट किंवा जाहिराती देतो. पण एक व्यक्ती तर याच्याही पुढे गेला. त्याने परफेक्ट लाइफ पार्टनर हवा यासाठी चक्क रस्त्यावर होर्डिंग लावलं आहे. आश्चर्य म्हणजे ही व्यक्ती साठीपार आहे, जिची दोन लग्न झाली आहेत आणि पाच मुलंही आहेत.
६६ वर्षांचे हे आजोबा दोन लग्न आणि पाच मुलं झाल्यानंतरही आपल्याला परफेक्ट लाइफ पार्टनर मिळाली नाही असं सांगतात. या वयातही त्यांनी आपल्यासाठी योग्य जोडीदारासाठी शोध सुरू केला आहे आणि त्यासाठी त्यांनी हटके मार्ग निवडला आहे.
अमेरिकेच्या (United States News) टेक्ससमध्ये (Texas) राहणारे 66 वर्षांचे जिम बेझ (Jim Bays). त्यांची दोन लग्न झाली, त्यानंतर दोन्ही पत्नींसोबत घटस्फोटही झाला. आता त्यांना पाच मुलं आहेत. पण आता ते परफेक्ट लाइफ पार्टनरच्या शोधत आहे. जिम अशा महिलेच्या शोधात आहे, जी फक्त त्यांच्यासाठी बनलेली असावी. साठी पार झाल्यानंतरही त्यांच्या आयुष्यात अशी महिला आली नाही. सुरुवातीला त्यांनी डेटिंग अॅपवर पार्टनरस शोधायला सुरुवात केली. पण हवं तसं प्रोफाईल मिळालं नाही.
यानंतर त्यांनी त्यांनी डेटिंग अॅप, मॅट्रिमोनिअल अॅड किंवा वेबसाईटची मदत घेतली नाही तर थेट रस्त्यावरच बोर्ड लावलं. टेक्ससच्या हायवेवर त्यांनी एक मोठा बिलबोर्ड लावला. होर्डिंगवर त्यांनी आपल्याला नेमकी कशी जोडीदार हवी ते सांगितलं आहे. सोबत आपला फोटो आणि फोन नंबरही दिला आहे. ज्यावर वॉईसमेलही पाठवता येईल. होर्डिंगवर त्यांनी लिहिलं आहे, मला एका चांगल्या महिलेचा शोध आहे. तिचं वय ५० ते ५५ वर्षे असावं. जी माझ्यासोबत फिरेल, माझ्याशी बोलेल आणि चांगल्या कामात माझी साथ देईल.
Austonia नावाच्या चॅनेलशी बोलताना त्यांनी सांगितलं की, जेव्हा तुमचं वय कमी असतं, तेव्हा साथीदार मिळणं सोपं असतं. पण या वयात ते कठीण आहे. त्यांना काही लोकांचे वॉईसमेलसुद्धा आले पण आतापर्यंत योग्य महिला त्यांना भेटली नाही.