काही दिवसांआधीच उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) च्या गोरखपुरमध्ये 70 वर्षीय वृद्धाने त्याच्या 28 वर्षीय सूनेसोबत मंदिरात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. दोघेही त्यांच्या नव्या जीवनात आनंदी आहेत. पण यापेक्षाही अचंबित करणारी एक घटना समोर आली होती. 68 वर्षीय एका आजोबाने आपल्याच 24 वर्षीय नातीसोबत लग्न केलं होतं. ऑनलाइन डेटिंग साइटवर त्यांची भेट झाली होती. दोघे भेटले, त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. त्याने तरूणी जेव्हा प्रेग्नेंट झाली तेव्हा त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. हे सगळं होईपर्यंत त्यांना हे माहीत नव्हतं की, ते नात्याने आजोबा-नात लागतात.
ही घटना अमेरिकेच्या फ्लोरिडातील मियामीची आहे. 7 वर्षाआधी म्हणजे 2016 मधील ही घटना आहे. 68 वर्षीय अब्जाधीश व्यक्ती आणि 24 वर्षीय तरूणी प्रेमात पडले होते. दोघांनी लग्न केलं. पण नंतर फॅमिली अल्बम पाहताना त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. फोटो बघताच तरूणीने सांगितलं की, फोटोतील व्यक्ती तिचा वडील आहे. तेव्हा वृद्ध व्यक्तीला धक्का बसला. त्याने सांगितलं की, तो त्याच्या मुलगा आहे. 68 वर्षीय या व्यक्तीने आधी दोन लग्ने केली होती. दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर त्याला लॉटरीमध्ये अब्जो रूपये मिळाले.
The Sun सोबत बोलताना या व्यक्तीने सांगितलं होतं की,लॉटरीमध्ये अब्जो रूपये जिंकल्यानंतर तो त्याच्यासाठी एका पार्टनरचा शोध घेत होता. या दरम्यान ऑनलाइन डेटिंग साइटवर त्यांची भेट झाली. 24 वर्षीय तरूणीने सांगितलं की, ती जॅक्सनविल्ले (Jacksonville) ची राहणारी आहे. तिला घरच्यांनी बाहेर काढलं आहे. त्यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये आले. तरूणी प्रेग्नेंट झाली आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. अचानक तीन महिन्यांनंतर फॅमिली अल्बम पाहताना तिला धक्का बसला. तिच्या पतीसोबत तिचे वडिलही फोटोत उभे होते. नंतर समजलं की, तरूणीने चुकून आपल्या आजोबासोबतच लग्न केलं आणि त्यांच्याकडूनच ती प्रेग्नेंट झाली. इतकंच नाही तर त्यांनी लग्नही केलं.
नातीसोबत लग्न करणाऱ्या वृद्ध व्यक्ती म्हणाला होता की, दोघांनाही घटस्फोट घेण्याची काही इच्छा नाही. व्यक्तीनुसार 2 अयशस्वी लग्नानंतर त्याला रिलेशनशिपमध्ये रहायचंच नव्हतं. तेच तरूणी म्हणाली की, प्रत्येक कपल काहीना काही कारणाने स्पेशल आणि इतरांपेक्षा वेगळं असतं. आमचंही तसंच आहे. आमच्या मजबूत बॉन्ड आहे. अशात आम्ही वेगळे होण्याचा विचार करत नाही.