पाकिस्तानमध्ये नेहमीच अजब-गजब घटना या घडत असतात. एकापेक्षा जास्त विवाह करणे ही नवीन गोष्ट नाही. पण याच दरम्यान एक हटके घटना समोर आली आहे. पाकिस्तानात एका 70 वर्षीय व्यक्तीने त्याच्यापेक्षा तब्बल 51 वर्षांनी लहान असलेल्या तरुणीशी लग्न केलं आहे. सध्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. 70 वर्षीय लियाकत अलीने 19 वर्षीय शुमाइलासोबत लग्न केलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा प्रेमविवाह आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघांची पहिली भेट लाहोरमध्ये झाली होती. जिथे शुमाइलाने पहिल्याच नजरेत तिचं हृदय लियाकत अलीला दिलं. शुमाइला म्हणते की प्रेमाला वयाचं बंधनं कधीच दिसत नाही. लियाकत अली यांनी शुमाइलाला ये-जा करताना पाहिले होते. यानंतर एकदिवशी तिला पाहून त्यांनी गाणे गुणगुणायला सुरुवात केली. त्यानंतर शुमाइलाने त्यांच्याकडे पाहिलं आणि पाहताच ते शुमाइलाच्या प्रेमात पडले.
नातेवाईकांचा होता आक्षेप
कुटुंबातील सदस्य आधी त्यांच्या नात्यासाठी तयार नव्हते. या संबंधावर त्यांचे नातेवाईक आक्षेप घेत होते. पण नंतर नातेवाईकांनी देखील होकार दिला. शुमाइला म्हणते की, लग्नात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदर आणि प्रतिष्ठा. वाईट व्यक्तीशी संबंध ठेवण्यापेक्षा योग्य व्यक्तीची निवड करणे लाखपट चांगले आहे असंही म्हटलं आहे.
पाकिस्तानमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. याआधी पाकिस्तानचे खासदार आणि टीव्ही अँकर आमिर लियाकत हुसैन यांनीही 18 वर्षीय सईदा दानिया शाहसोबत लग्न केलं होतं. त्यावेळी आमिर लियाकत हुसैन 49 वर्षांचे होते. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि 3 महिन्यांतच त्यांचं नातं तुटलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"