नवी दिल्ली : सरकारने २०१३-२०१४ दरम्यान देशात व देशाबाहेर ७,८०० कोटी रुपयांच्या काळ््या पैशाचा शोध लावला आहे. आर्थिक गुप्तचर शाखेने (एफआययू) याद्वारे देशातील आतापर्यंतची सगळ््यात मोठी आर्थिक देवाणघेवाण उघडकीस आणली आहे.अर्थ मंत्रालयाने तयार केलेल्या ताज्या अहवालानुसार एफआययूने केलेल्या कारवाईदरम्यान आयकर विभागाने ७,०७८ कोटी रुपयांचा बेहिशेबी काळा पैसा उघडकीस आणला आहे. सेवा कर व सीमा शुल्क विभागांनी ७५० कोटी रुपयांचा काळा पैसा उघडकीस आणला आहे. अर्थ मंत्रालयांतर्गत येणाऱ्या तांत्रिक गुप्तचर शाखेने देशव्यापी स्तरावर संशयास्पद देवाणघेवाणीचा अहवाल तयार केला. सक्तवसुली संचालनालयानेदेखील २० कोटी रुपयांशी संबंधित गुन्ह्यांचा शोध लावला आणि १७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. आयकर विभागाने १६३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली असून याचदरम्यान सेवा कर विभागाने १७ कोटी रुपयांच्या संपत्तीला सील केले आहे.अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुुसार एफआययूने गेल्या वर्षी (२०१३-२०१४) एकूण ७,८४८ कोटी रुपयांचा शोध लावला आहे. संशयास्पद व्यवहारांचा अहवाल मिळाल्यानंतर २०१३-२०१४ दरम्यान या व्यवहारांमध्ये १०० टक्के वाढ झाल्याचे आढळले.
७,८०० कोटी रुपयांचा काळा पैसा उघडकीस
By admin | Published: April 27, 2015 1:01 AM