मोठी माणसं, समाजातील सधन लोक गोरगरिबांना मदत करतात हे तुम्ही पाहिले असले. पण लहान मुलंही अनेकदा मन मोठं करत, समजूतदारपणा दाखवत इतरांना मदत करतात हे लॉकडाऊनच्या काळात तुम्ही सगळ्यांनीच पाहिलं असेल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चिमुरड्याबद्दल सांगणार आहोत. इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या एका चिमुरड्यानं शंभरापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची बोर्डाची परिक्षा फी भरली आहे. या मुलाचे नाव अधिराज सेजवाल आहे.
अधिराज दिल्लीतील एका खासगी शाळेतील विद्यार्थी आहे. मात्र त्याचे विचार आणि इच्छाशक्ती एखाद्या मोठ्या आणि अनुभवी व्यक्ती इतकी आहे. लहान वयातच अधिराज दहावी आणि बारावीच्या १०० पेक्षा जास्त मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा बाळगून त्यांची मदत करत आहे. अधिराजची आई दिल्लीतील बेगमपूरमध्ये एका सरकारी शाळेतील शिक्षिका आहे. त्याच्याकडून अधिराजला कळलं की, सरकारी शाळेतील काही मुलं आपली फी भरू शकत नाही. त्याचवेळी अधिराजने या मुलांसाठी काहीतरी करण्याचा विचार केला.
अधिराजने सगळ्यात आधी आपली पिगी बँक तोडली. त्यात जवळपास १२ हजार पाचशे रुपये जमा झाले होते. या पैश्यांचा वापर करून अधिराजने मुलांची शाळेची फी भरून मदत केली. त्यानंतर लोकांकडून मदत मागून अधिराजने २ लाख रुपयांपर्यंत रक्कम गोळा केली आणि हे पैसै १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी दिले. अर्थात या गरिब मुलांची बोर्डाच्या परिक्षेची फी भरली. बापरे! मार्शल आर्ट्सनी डोळ्यांवर पट्टी बांधून फोडले तब्बल ४९ नारळ, पाहा थरारक व्हिडीओ
अधिराजने सांगितले की, ''मी माझ्या आईचं फोनवरील संभाषणं ऐकलं त्यातून मला या गरीब मुलांच्या समस्यांची कल्पना आली. तेव्हा मी पीगी बँक तोडण्याचा विचार केला. माझ्या वर्गमित्रांच्या पालकांनीही यात माझी मदत केली. तसंच माझ्या वडिलांनीही मला या कामासाठी पाठिंबा दिला. '' जगभरात व्हायरल होतोय गाईला मिठी मारण्याचा ट्रेंड, ही भानगड नक्की काय रे भाऊ?