जगातील अनेकांना त्यांच्या नोकरीवर खूप प्रेम आहे. मात्र, केवळ बळजबरीने काम करणारेही अनेक जण आहेत. त्यांना त्यांचे काम आवडत नाही. ते फक्त पैशासाठी काम करतात. पण जेव्हा तुम्हाला काम आवडतं तेव्हा ते करायला खूप मजा येते, मग नोकरीचं ओझं वाटत नाही. आपल्या कामावर अशाप्रकारे प्रेम केल्यामुळे एका महिलेने जागतिक विक्रम केला आहे. बेट्टे नष (Bette Nash) असे त्यांचे नाव आहे. त्या एअरहोस्टेस असून बेट्टे नश यांनी जगातील सर्वात वयोवृद्ध एअर होस्टेसचा (Oldest Air Hostess) मान मिळवला आहे.
८६ वर्षीय बेट्टे नष यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Record) या आठवड्यातच नोंदवले गेले. अमेरिकन एअरलाइन्सशी त्या दीर्घ काळापासून जोडलेली आहे. आतापर्यंत त्यांनी आपल्या आयुष्यातील ६५ वर्षे एअर होस्टेस म्हणून घालवली आहेत आणि याबरोबरच त्यांनी जागितक विक्रम केला आहे. बेट्टे मूल या मूळ मैच्युसेट्स येथील रहिवासी आहेत. तिने १८५७ मध्ये एअर होस्टेस म्हणून करिअरला सुरुवात केली. याच वर्षी मानवाने बनवलेला पहिला उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला होता.
बेट्टे नष या इतक्या मोठ्या कालावधीपासून एअर होस्टेस आहेत की, त्यांना अनेक प्रवाशी ओळखतात. एका प्रवाशाने सांगितले की, त्याने आतापर्यंत अनेकवेळा विमानात प्रवास केला आहे. मात्र, ज्या मार्गात बेट्टे नश असतात तो स्पेशल होऊन जातो. एबीसी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, एअरलाईन्स बट्टे यांना आपल्या आवडीचा मार्ग निवडीचे स्वातंत्र्य देते. मात्र, त्या नेहमी न्यूयॉर्क-बोस्टन-वॉशिंगटन डीसी हा मार्गच निवडतात. यामागचे कारण म्हणजे त्यांचा मुलगा. त्यांचा मुलगा दिव्यांग आहे. तसेच केअरटेकर त्याची देखभाल करते. त्यामुळे बेट्टे नश याच मार्गाने घरी जातात.
नवोदित एयरहोस्टेसला दिला हा सल्ला -बेट्टे यांनी एअरलाइन्ससोबत जुळणाऱ्या नवीन एयरहोस्टेसला अनेक सल्ले दिले आहेत. त्यांच्या मते, या नोकरीत माणूसकीला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. सोबतच जोपर्यंत आपले आरोग्य व्यवस्थित आहे, तोपर्यंत काम करू नये. यात आनंद मिळतो, असेही त्या म्हणाल्या आहेत. बेट्टे नश यांनी आपल्या आयुष्यात राणी एलिझाबेथप्रमाणे डायमंड ज्युबिली साजरी केली आहे. त्यांना आपल्या या विक्रमामुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.