गुजरातच्या(Gujarat) 181 अभयम हेल्पलाइनमध्ये एक अशी घटना समोर आली आहे जी ऐकून सर्वांनाच धक्का बसला. महिलांची समस्या दूर करणाऱ्या हेल्पलाइन नंबरवर वडोदराची राहणारी 87 वर्षी वयोवृद्ध महिलाने फोन केला. त्यांनी सांगितलं की, त्या त्यांच्या 89 वर्षीय हायपरसेक्शुअल पतीला वैतागली आहे. तिला तिच्या पतीपासून सुटका हवी आहे. त्यासाठी तिला मदत हवी आहे.
ही घटना सयाजीगंजमधील आहे. महिलेने आरोप केला की, वृद्ध पती तिच्याकडे नेहमी नेहमी शरीरिक संबंधाची डिमांड करत राहतो. महिलेने सांगितलं की, ती फार आजारी आहे आणि अशात ती पतीची इच्छा पूर्ण करू शकत नाही.
अभयम हेल्पलाइनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'दोघांमध्ये अनेक वर्ष चांगलं रिलेशनशिप होतं. पण महिला एक वर्षाआधी आजारी पडली आणि तिला बेडवरून उठणंही अवघड झालं आहे. ती मोठ्या मुश्किलीने हालचाल करू शकते. हालचालीसाठी तिला मुलगा आणि सूनेची मदत घ्यावी लागते'. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोपी पतीला त्याच्या पत्नीची स्थिती चांगलीच माहीत आहे. पण तरीही तो तिच्याकडे शारीरिक संबंधाची डिमांड करत राहतो.
रिपोर्ट्सनुसार, महिलेचा पती रिडायर्ड इंजिनिअर आहे. तो घरात नेहमीच भांडण करतो. त्याची डिमांड पूर्ण झाली नाही तर तो पत्नीसोबतच मुलावरही ओरडतो. शेजाऱ्यांनाही माहीत आहे की, यांच्या घरात नेहमीच भांडण होत राहतं. पण पाणी डोक्यावरून गेल्यामुळे पत्नीने अभयम हेल्पलाइनवर फोन करून मदतीची मागणी केली.
अभयम अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'आम्हाला दोन दिवसांपूर्वी महिलेचा फोन आला होता. आम्ही लगेच त्यांच्या घरी गेलो आणि त्यांच्या पतीला भेटलो. आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना हेही म्हणालो की, यामुळे तुमची प्रतिष्ठा धुळीस मिळत आहे आणि तुमची पत्नी हैराण आहे'.
मग अभयम टीमने आरोपी पतीची काउन्सेलिंग केली. आपल्या आवश्यक गोष्टींना डायवर्ट करण्यासोबत आणि सीनिअर क्लबस जॉइन करण्याचा आग्रह केला. अभयम अधिकाऱ्यांनी परिवाराच्या सदस्यांनी त्याना काउन्सेलिंग करण्याचा आणि सेक्सॉलॉजिस्टकडे जाण्याचा सल्ला दिला.