मेडिकल जगतात अशा कितीतरी घटना समोर येत असतात ज्या पाहून डॉक्टरही हैराण होतात. कधी लोकांच्या पोटातून मोबाइल चार्जर निघतं तर कधी जिवंत मासा. अशा विचित्र घटना जास्तीत जास्त चीनमधूनच समोर येतात. आता पुन्हा एक विचित्र घटना समोर आली आहे. चीनमध्ये राहणाऱ्या ९ वर्षाच्या मुलाच्या पोटात डॉक्टरांना खेळण्यातील बाण मिळाला. जो पाहून डॉक्टर हैराण झाले. जेव्हा डॉक्टरांनी तपासणी केली तर त्यांच्या लक्षात आले की, त्याने हा बाण पार्श्वभागातून आत घुसवला होता. पण हा बाण काढण्यासाठी डॉक्टरांनी सर्जरी न करता वेगळा उपाय केला.
चीनमध्ये राहणाऱ्या एका मुलाच्या पोटातन डॉक्टरने ५ ते ७ इंचाचा लांब बाण काढला. हा बाण चुकून मुलाने पार्श्वभागात घुसवला होता. असे सांगितले जाते की, ९ वर्षीय मुलगा घरात एकटाच होता. तेव्हाच ही घटना घडली. खेळता खेळता मुलाने हा बाण पार्श्वभागातून आत घुसवला.
डॉक्टरांना हा बाण त्याच्या पोटाचं स्कॅन करताना दिसलं. त्याच्या पोटात दुखत होतं म्हणून आई-वडील त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले होते. ३० जूनला ही घटना पीपल्स हॉस्पिटलमध्ये पोटात दुखत असल्यावर घेऊन गेल्यावर समोर आली.
हॉस्पिटलच्या सोशल मीडिया पोस्टवरून कळालं की, ही घटना तेव्हा घडली जेव्हा ९ वर्षीय मुलाचे आई-वडील त्याला घरात एकटा ठेवून बाहेर गेले होते. डॉक्टरांनी सर्जरी न करता हा बाण मुलाच्या पोटात पाणी भरून नैसर्गिक पद्धतीने काढला. डॉक्टरांनी सांगितले की, बाण पोटाला रूतला असता तर मुलाच्या जीवालाही धोका झाला असता.
बोंबला! ...म्हणून टायर नसूनही चालवली 'त्याने' कार, कारण ऐकल्यावर हैराण झाले पोलीस!
एअरपोर्टवर अनेक महिन्यांपासून उभी आहे एक कार, नंबर प्लेटवर लिहिलं आहे 'Covid 19'