शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

गोरी गोरी पोर माझ्या मनान भरली...; रिक्षा चालकाशी लग्न करायला 'फॉरेनची मुलगी' भारतात आली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 3:58 PM

मायदेशी परतल्यानंतर कॅमिली सोशल मीडियाच्या माध्यमातून अनंतराजूच्या संपर्कात राहिली आणि त्यांच्याशी सतत बोलत होती.

हंपी - कर्नाटकातील अनंतराजू आणि बेल्जियममधील कॅमिली यांची कहाणी सध्या चर्चेत आहे. दोघांनी शुक्रवारी २५ नोव्हेंबरला हंपीच्या विरुपाक्ष मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. ३० वर्षीय अनंतराजू रिक्षाचालक असून तो टुरिस्ट गाईड म्हणूनही काम करतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनंतराजूची ओळख २७ वर्षीय कॅमिलीची झाली त्यानंतर हळूहळू दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. 

मिळालेल्या माहितीनुसार, अनंतराजू याची कॅमिलीसोबत पहिली भेट २०१९ मध्ये झाली होती. तेव्हा कॅमिली तिच्या कुटुंबासह हंपीला फिरायला आली होती. त्यावेळी अनंतराजू यांनी त्यांना गाईड केले. सोबतच त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कॅमिली आणि कुटुंब भारत भेटीदरम्यान, अनंतराजू यांच्या प्रामाणिकपणाने आणि आदरातिथ्याने हे खूप प्रभावित झाले.

अशा परिस्थितीत, मायदेशी परतल्यानंतर कॅमिली सोशल मीडियाच्या माध्यमातून अनंतराजूच्या संपर्कात राहिली आणि त्यांच्याशी सतत बोलत होती. काही महिने बोलल्यानंतर दोघेही एकमेकांना पसंत करू लागले. पण कोरोना महामारीमुळे त्याची भेट होऊ शकली नाही. मात्र, काही महिन्यांनी दोघांनी आपापल्या कुटुंबियांना त्यांच्या 'लाँग डिस्टन्स लव्ह'बद्दल सांगितले त्याला दोन्ही कुटुंबीयांचा कोणताही आक्षेप नव्हता. त्यांनी या जोडप्याला लग्नाला होकार दिला. अखेर शुक्रवारी दोघांचा विवाह झाला.'पुन्हा येण्याचं दिलं होतं वचन'अनंतराजूनं सांगितले की, कॅमिली २०१९ मध्ये तिच्या आई-वडील आणि भावंडांसोबत हंपीला आली होती. हंपीला ते पहिल्यांदाच आले असल्याने त्यांना इथल्या राहण्याची आणि जेवणाची काळजी वाटत होती. पण मी त्यांना राहण्यासाठी सर्वोत्तम हॉटेल मिळेल याची काळजी घेतली. कुटुंब माझ्या व्यवस्थेवर खूश झाले आणि त्यांनी मला वचन दिले की ते पुन्हा हंपीला भेट देतील. त्यात माझं आणि कॅमिलीचे सोशल मीडिया आणि फोनवरून बोलणे सुरू झाले.

'प्रेमाला सीमा नसते'आम्ही काही दिवसांतच एकमेकांच्या प्रेमात पडलो. गेल्या वर्षीच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, पण कोरोनामुळे ते लांबले. मात्र, आता आमचे लग्न हिंदू रितीरिवाजांनुसार झाले. लग्नासाठी कॅमिलीचे जवळपास ४० नातेवाईक आणि मित्र हंपी येथे आले होते. हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप छान क्षण होता. प्रेमाला सीमा नसतात हे माझ्या लग्नाने सिद्ध केलं. दुसरीकडे बेल्जियमहून परत येऊन अनंतराजू यांच्याशी लग्न करणे ही खूप छान स्वप्न असल्याचे कॅमिलीचे म्हणणं आहे. मी त्यांच्यावर प्रेम करते असं कॅमिली म्हणाली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :marriageलग्न