Apple ने अनेकांचं आयुष्य सोपं केलं आहे. अॅपलच्या अनेक उत्पादनांमध्ये लाइफ सेव्हिंग फीचर्स मिळतात. सुरुवातीला कंपनी Apple Watch मध्ये SOS फीचर देत होती, पण आता iPhone 14 मध्येही हे फीचर देण्यात आलं आहे. यादरम्यान एक बातमी समोर आली आहे, ज्यानुसार या फीचरमुळे एका कुटुंबाचा जीव वाचला आहे.
iPhone 14 ने वाचवला जीव
Montrose Research and Rescue Team च्या ट्विटनुसार, अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये असलेल्या एंजिल्स फॉरेस्ट हायवेवर कारमधून जाणाऱ्या एका कुटुंबाचा अपघात झाला. कारमधून पती-पत्नी जात होते आणि त्यांची कार 300 फूट उंचीवरुन खोल दरीत कोसळली. यावेळी सुदैवाने कार खाली न आदळता, मध्येच अडकून पडली. त्यांच्या फोनमध्ये नेटवर्कही नव्हते. यावेळी त्यांच्या iPhone 14 ने त्यांची मदत केली.
Satellite SOS feature
iPhone 14 सीरीजमध्ये क्रॅश डिटेक्शन फीचर आहे, जे गाडीचा अपघात डिटेक्ट करतो. हे फीचर इमरजंसी नंबरला फोन करुन मदत मागवतो. या फीचरला सॅटेलाइट SOS फीचरदेखील म्हणतात. अपघातादरम्यान iPhone मध्ये नेटवर्क नव्हते, त्यामुळे फोनने सॅटेलाइट फीचरच्या मदतीने बचाव दलासी संपर्क केला. सॅटेलाइट फीचरने सुरुवातीला अॅपल रिले सेंटरमध्ये मेसेज केला आणि नंतर L.A काउंटी शेरिफ डिपार्टमेंटला कॉल केला. रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओही ट्विट करण्यात आला आहे.