एका जोडप्यानं १८० बेडचं संपूर्ण हॉटेल बुक केले; त्यानंतर ‘जे’ काही केले ते ऐकून कौतुक कराल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 03:31 PM2022-03-23T15:31:56+5:302022-03-23T15:32:20+5:30
सुरुवातीला गोलाटा जोडप्याने सीमेवर ८ तास मिनीबस चालवली. शरणार्थींना सुरक्षित इतर देशातील त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांकडे पोहचवले.
रशियानं यूक्रेनवर हल्ला केल्यानंतर अनेकजण तेथून देश सोडून इतर देशात स्थलांतर करत आहेत. शरणार्थींना आश्रय देण्यासाठी ब्रिटनच्या एका कपलने पॉलंडमध्ये एक पूर्ण हॉटेल बूक केले. जॅकब गोलाटा आणि गोसिया गोलाटा हे दोघं २००४ मध्ये यूकेत आले होते. या दोघांनी ब्यडगोस्जकज येथे पार्क हॉटेल ट्रिस्ज्जिन(Tryszczyn) बुक केले. या हॉटेलमध्ये यूक्रेनमधून हल्ल्यामुळे स्थलांतरीत झालेल्या शरणार्थींना राहण्याची व्यवस्था केली आहे.
१५० लोकांना यूक्रेन बॉर्डरहून हॉटेलला आणला..
आतापर्यंत १५० लोकांना यूक्रेनच्या सीमेवरून पॉलंडजवळ असलेल्या या हॉटेलमध्ये आणलं आहे. ४२ वर्षीय जॅकब गोलाटा म्हणाले की, मी तात्काळ मदतीसाठी पुढे सरसावलो परंतु इच्छा असूनही जास्त जणांना मदत करू शकलो नाही. ४८ आसनी बस बुक केली जेणेकरून यूक्रेनमधील शरणार्थींना सुरक्षित स्थळी आणलं जाईल. पार्क हॉटेलच्या बाहेर स्वयंसेवक तयार होते. ज्यांना गोलाटी जोडप्यांनी सू रायडर चॅरिटीच्या माध्यमातून मदत केली होती.
जोडप्याने सीमेवर ८ तास मिनीबस चालवली
सुरुवातीला गोलाटा जोडप्याने सीमेवर ८ तास मिनीबस चालवली. शरणार्थींना सुरक्षित इतर देशातील त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांकडे पोहचवले. अनेकदा या जोडप्याच्या मनात आले की आणखी काही करण्याची गरज आहे का? तेव्हा एक विचार आला की जर मी पूर्ण हॉटेल भाड्याने घेतले तर त्या हॉटेलमध्ये महिला आणि मुलांना ठेवता येईल. त्यानंतर शरणार्थींना सुरक्षित असल्याची भावना निर्माण होईल. ते सर्वात चांगले राहील असं गोलाटा म्हणाले.
जोडप्याने १८० बेडचं हॉटेल बुक केले
गोलाटा जोडप्याने शरणार्थींना मदत करण्यासाठी १८० बेड असलेले पूर्ण हॉटेल बुक केले. जे कोविड महामारीमुळे बंद ठेवलं होतं. या जोडप्याने हॉटेल व्यावसायिकाला स्वत:चे पैसे देत शरणार्थींना मदत करण्यासाठी तयार राहण्यास सांगितले. सीमेवर ४८ तास मिनीबस चालवली. त्याठिकाणी जोडप्याने अनेक शरणार्थींना सुखरुप सुरक्षित स्थळी पाठवलं. आता यूक्रेनच्या पूर्व भागात अडकलेल्या लोकांवर या जोडप्याने लक्ष केंद्रीत केले आहे. कारण रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत सर्वात जास्त नुकसान आणि हिंसा याठिकाणी झाली आहे.