लग्न म्हटलं की कुटुंबामध्ये जल्लोषाची तयारी, सगळीकडे आनंदी वातावरण, युवक-युवतीच्या आयुष्यातला सगळात मोठा क्षण, लग्न कुठे, कसं करायचं याची धामधुम सुरू असते. परंतु एका कपलनं लग्नाचं जे ठिकाण निवडलं ते पाहून पाहुणे हैराण झाले. लग्नासाठी कपलनं अशी जागा निवडली ज्याठिकाणी आयुष्याच्या सरतेवेळी अंत्यविधीसाठी लोक पोहचतात. एका स्मशानभूमीत लग्न करण्याचा अनोखा निर्णय या कपलनं घेतला.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया रिडली येथे राहणाऱ्या २७ वर्षीय नोर्मा निनोने २९ वर्षीय एक्सेलसोबत लग्न केले. लग्नासाठी नोर्मा रुग्णवाहिकेतून पोहचली. कब्रस्तानात दफन केलेल्या मृतदेहांशेजारीच त्या दोघांनी लग्न केले. विशेष म्हणजे लग्नासाठी नवरीने सफेद रंगाचा ड्रेस घातला होता तर या अनोख्या लग्नासाठी नवऱ्याने ब्लॅक ड्रेस परिधान केला होता. लग्नात आलेले पाहुणे अनोखी वेडिंग पाहून हैराण झाले. परंतु ताबूत बनवण्याचं काम करणाऱ्या नोर्माने लग्न परफेक्ट असल्याचं सांगितले.
नोर्माने सांगितले की, मला स्मशानात लग्न करायचं होतं. हे शहरातील पहिलं स्मशान आहे जे महिलांकडून चालवलं जाते. ही जागा माझ्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे कारण मी इथे अनेक वर्ष काम केलंय. हैलोवीन थीम वेडिंग माझ्यासाठी परफेक्ट होतं कारण मला हॅलोवीन खूप पसंत आहे. माझे कुटुंबात अंधविश्वास आहे. त्यामुळे सुरुवातीला ते अशाप्रकारे लग्नाला घाबरले होते. परंतु लग्नाच्या दिवशी सर्वांनी तुझ्यामुळे आम्हाला हे अनोख लग्न एन्जॉय करता आले असं म्हटलं.
लग्नासाठी नोर्मानं सर्व पाहुण्यांना १९३० च्या दशकातील स्टाइल वेशभूषा करण्यास सांगितले होते. नोर्मा आणि एक्सेल ऑगस्ट २०१८ मध्ये पहिल्यांदा टिंडरवर भेटले होते. २ वर्ष डेटिंग केल्यानंतर एक्सेलने नोर्माला प्रपोज केले. त्यानंतर दोघांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये लग्न केले. सुरुवातीला कपलनं योजमाइट नॅशनल पार्कमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु नार्माकडे दुसराही प्लॅन होता. एक्सेल वेन्यूवरून चिंतेत होता. परंतु काही महिन्यांनी तो स्मशानात लग्न करण्यासाठी तयार झाला. त्यानंतर आम्ही एकत्रित त्याठिकाणी लग्न केले.