Sun Coronal Hole: सूर्यमालेतील सर्वात महत्वाचा ग्रह असलेल्या सूर्याच्या पृष्ठभागावर शास्त्रज्ञांना एक मोठे छिद्र आढळले आहे. त्याची रुंदी 8 लाख किलोमीटर असून, यात 60 पृथ्वी सामावू शकतात. भितीदायक बाब म्हणजे, या छिद्रातून अतिशय तीव्र सौर लहरी पृथ्वीच्या दिशेने येत आहेत. अचानक निर्माण झालेल्या एवढ्या मोठ्या छिद्रामुळे शास्त्रज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत.
शास्त्रज्ञांना सूर्याच्या विषुववृत्तावर हे छिद्र सापडले आहे. 2 डिसेंबर 2023 रोजी याचा शोध लागला. पण 24 तासांत ते छिद्र वेगाने वाढले आणि 8 लाख किलोमीटर रुंद झाले. याचा अर्थ या छिद्राची लांबी 60 पृथ्वीएवढी झाली आहे. अचानक हे छिद्र तयार झाल्याने शास्त्रज्ञ चकीत झाले आहेत. या छिद्रातून तीव्र लहरी पृथ्वीच्या दिशेने येत आहेत.
अशाप्रकारच्या छिद्राला कोरोनल होल (Coronal Hole) म्हणतात. सूर्याला एकाच ठिकाणी धरुन ठेवणारे चुंबकीय क्षेत्र अचानक फुटते, तेव्हा हे कोरोनल होल तयार होतात. अशाप्रकारच्या छिद्रातून भयानक रेडिएशन बाहेर पडते. या छिद्रातून बाहेर पडणाऱ्या लहरी हा सौर वाऱ्यापेक्षा अधिक शक्तिशाली असतात. हे छिद्र आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही.
हे कोरोनल होल सूर्याच्या पृष्ठभागावर किती काळ राहील, हे अद्याप शास्त्रज्ञांनाही माहित नाही. पण गेल्या वेळी तयार झालेला कोरोनल होल सूर्यावर 27 दिवस राहिला होता. लवकरच हे छिद्र आपली जागा बदलून पृथ्वीपासून वेगळ्या दिशेने जाईल असा अंदाज नासाने वर्तवला आहे. त्यामुळे येणारे काही दिवस पृथ्वीसाठी महत्वाचे असणार आहेत.