Maulana Mohammed Bello Abubakar: आजच्या काळात लोकसंख्या जास्त वाढू नये म्हणून अनेक देशात वेगवेगळे कायदे केले जात आहेत. अनेक ठिकाणी तर लोक इतके बिझी झाले आहेत की, त्यांच्याकडे मुलांना जन्म देण्यासही वेळ नाही. या देशांमध्ये साऊथ कोरियाचाही समावेश आहे. या देशात लोकांकडे मुलांना जन्म देण्याचाही वेळ नाहीये. या लोकांचं मत आहे की, मुलांना जन्म दिल्यानंतर ते त्यांचा सांभाळही करू शकत नाहीत. त्यामुळे ते मुलं होऊच देत नाहीत.
पण जगात असेही काही लोक आहेत जे एक-दोन किंवा 10 नाहीतर शेकडो मुलांना जन्म देण्यासही मागेपुढे बघत नाहीत. आज आम्ही तुम्हाला एका अशाच मौलानाबाबत सांगणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सेंट्रल नायजर स्टेटमध्ये राहणारे मोहम्मद बेल्लो अबूबकर यांच्याबाबत. सध्या ते या जगात नाहीत. तरीही लोक त्यांच्याविषयी एका अजब कारणाने चर्चा करतात.
बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत अबूबकर यांनी सांगितलं होतं की, अनेक लोक एका पत्नीमुळेच हैराण होतात. पण त्यांना अल्लाने अशी शक्ती दिली होती ज्यामुळे ते 130 पत्नींना सांभाळू शकले. त्यांच्या जास्तीत जास्त पत्नी त्यांच्याकडे उपदेश घेण्यासाठी येत होत्या.
आपल्या स्टुडंट्ससोबतच मौलाना लग्न करत गेले. जेव्हा इतकी लग्ने केल्यावर अबूबकर यांना अटक करण्यात आली तेव्हा त्यांच्या सर्व पत्नींनी त्यांना साथ दिली आणि तुरूंगातून सोडवलं. जिवंतपणी अबूबकर यांनी दुसऱ्यांना शंभरपेक्षा जास्त लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्यानुसार, हे अल्लाव्दारे त्याना देण्यात आलेलं मिशन होतं. जे त्यांनी पूर्ण केलं. या 130 बायकांकडून त्यांना 203 मुले झाली होती.