समुद्रात अनेक जहाजं अपघातामुळे बुडतात. अनेक वर्षांआधी बुडालेली जहाजं आजही समुद्राच्या तळाशी आहेत. महत्वाची बाब म्हणजे आजही या जहाजांमध्ये अब्जो रूपयांचा खजिना दडलेला आहे. पण ही जहाजं शोधणं काही सोपं काम नाही. अशाच एका बुडालेल्या जहाजाचा शोध नुकतान सुरू करण्यात आला आहे. जर हे जहाज सापडलं तर कोलंबिया देशाचं नशीब चमकणार आहे. कारण यात अब्जो रूपयांचं सोनं दडलेलं आहे.
मर्चेंट रॉयल नावाचं जहाज 1641 मध्ये एका समुद्री वादळात अडकलं होतं. हे जहाज तेव्हा कॉर्नवालच्या तटावर बुडालं होतं. 2019 मध्ये याचा शोध लावण्यात आला. त्यावेळी या जहाजाचा वरील भाग सापडला होता. पण खालचा भाग अजूनही सापडला नाही. आता अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा या जहाजाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आता या जहाजाला शोधण्याचं काम ‘मल्टीबीम सर्विसेज’ ही कंपनी करणार आहे. यासाठी सोनार टेक्निकचा वापर केला जाणार आहे. काही रिपोर्टनुसार, या जहाजाच्या मलब्यामध्ये अब्जो पाउंड किंमतचं सोनं आणि चांदी असण्याचं अंदाज आहे.
पणं कंपनीसाठी हे काही सोपं नाही. त्यांच्यासाठी हे एक मोठं आव्हान आहे. कंपनीचे मुख्य निगेल हॉज यांनी मीडियासोबत बोलताना सांगितलं की, तिथे जहाजांचे हजारो तुकडे आहेत आणि मर्चेंट रॉयल त्यांच्यापैकी एक आहे. अशात आम्हाला खूपसारा मलबा उचलावा लागणार आहे. तेव्हा योग्य गोष्टीचा शोध लागेल. हे काही सरळ काम नाही. जर सोपं असतं तर आतापर्यंत हे काम झालं असतं. पण यावर्षात आम्ही हे जहाज शोधून काढू.
मर्चेंट रॉयल जहाजाला आपल्या खजिन्यामुळे "एल डोरॅडो ऑफ द सीज" नाव देण्यात आलं होतं. हे जहाज 23 सप्टेंबर 1641 ला अपघात झाला तेव्हा डार्टमाउथच्या मार्गाने होतं. बुडण्याआधी जहाज डागडुजीसाठी मेक्सिको आणि कॅरेबियनहून परतीच्या प्रवासावर अतिरिक्त माल लोड करण्यासाठी कॅंडिज स्पेनिश बंदरावर थांबलं होतं.