कित्येक वर्ष मेहनत घेतल्यानंतर काहींना सरकारी नोकरी मिळते. परंतु काहीजण या नोकरीत समाधानी नसल्याने नोकरी सोडून करिअर निवडतात. ब्रिटनच्या २३ वर्षीय सुमैया सादीनेही असेच काही केले. बऱ्याच मेहनतीनंतर तिने तिच्या स्वप्नातील नोकरी मिळवली. राजकारणाबद्दल असलेली आवड पाहता तिने युवा संसद आणि मॅनचेस्टर यूथ काऊन्सिलचे सदस्य म्हणून काम सुरू केले. परंतु काही काळाने तिच्या करिअरमध्ये असा बदल झाला ज्याने ती सर्वत्र चर्चेत आली.
उद्घाटनालाची लोकांची गर्दी
आता सुमायाहने मुस्लीम महिलांसाठी कपड्यांचे छोटे दुकान उघडले आहे. त्याचे नाव सुमैया आहे जे मोडेस्ट फॅशन ब्रँड आहे. याठिकाणी मुस्लीम महिला वापरतात ती पोशाख विकले जातात. लोकांनी या दुकानाच्या उद्घाटनालाच मोठी गर्दी केली. जवळपास १ हजाराहून अधिक ग्राहक आल्याने तब्बल ७ तास रांग लावाली लागली. कोरोना महामारीच्या काळात सुमैयाने करिअरची दिशा बदलली आणि कपडे विकण्यास सुरुवात केली.
सुमैयाने सांगितले की, मला आधी वाटायचे मला स्वप्नातील नोकरी मिळावी त्यासाठी मी १५-१८ या वयात प्रचंड मेहनत घेतली आणि युवा संसद बनली. परंतु जेव्हा मी त्याठिकाणी काम करत होती तेव्हा मला जाणवलं की जे काम मी करतेय त्यातून मला समाधान मिळत नाही. कोविड संपल्यानंतर मला वर्क फ्रॉम होम संपवून पुन्हा ऑफिसला जावे लागले. त्यानंतर आयुष्यात काहीतरी नवीन करावं असा माझा विचार होता. कोविडमध्ये मी कपडे बनवण्यापासून विकण्यापर्यंत युट्यूब व्हिडिओ पाहिले. हे नवीन कौशल्य विकसित करावे असं मला वाटले.
सुमैयाने एक शिलाई मशिन आणि साहित्य खरेदी करून कपडे बनवण्यास सुरुवात केली. त्यानंतर इन्स्टावर व्हिडिओ अपलोड केले. त्याला चाहत्यांनीही प्रतिसाद दिला. फोलोअर्सने तुम्ही कपडे विकू शकता असं सांगितले. त्यानंतर कपडे विकण्याचा व्यवसाय सुरू झाला. एका मॅन्युफॅक्चरशी संपर्क साधून लंडनमध्ये एक स्टोअर उघडले. परंतु काही काळाने हे स्टोअर बंद पडले. परंतु पुन्हा आता हे दुकान देशाच्या राजधानीत उघडत आहे. आता सुमैयाची कंपनी २ वर्ष जुनी आहे. हा ब्रँड लोकप्रिय होत चालला आहे. १४५ K हून अधिक फोलोअर्स टिकटॉकच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. जिथे ती सेकंदात तिचे कपडे विकते.