ऑनलाइन लोकमतमाद्रिद, दि. 19 - वयाच्या 64 व्या वर्षी अपत्यप्राप्ती होईल याची कुणी कल्पनाही करणार नाही. मात्र, स्पेनमध्ये 64 वर्षांच्या एका आजीबाईंना जुळे झाले आहे. वृद्धावस्थेची पेन्शन घेणार्या या आजीबाई सर्वाधिक वयात आई होणार्या जगातील काही महिलांपैकी एक आहेत. विशेष म्हणजे सहा वर्षांपूर्वीच या महिलेने एका मुलीला जन्म दिला होता.
या महिलेला आता झालेल्या जुळ्यांमध्ये एक मुलगा व एक मुलगी आहे. ही गर्भधारणा आयव्हीएफ तंत्राद्वारे करण्यात आली होती. या जुळ्यांच्या जन्मावेळी बरीच गुंतागुंत निर्माण झाली होती, पण सर्व काही सुखरूप पार पडले.
आयव्हीएफ तंत्राच्या सहाय्यानेच सहा वर्षांपूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 62 वर्षांच्या एका महिलेने मुलीला जन्म दिला होता. आता तिचा विक्रम स्पेनमधील या महिलेने मोडला आहे. मात्र, तिची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.