चीनमधून नेहमीच अजब अजब हैराण करणाऱ्या घटना समोर येत असतात. अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. इथे एका कपलवर आरोप आहे की, त्यांनी त्यांच्या 16 वर्षाच्या मुलीला मृतदेह विकला. मुलीची मृतदेह 'घोस्ट ब्राइड' म्हणून विकण्यात आला. कपलने या मुलीला दत्तक घेतलं होतं. एका व्यक्तीने त्यांच्यावर आरोप लावला आहे. पोलिसांना जेव्हा घटनेची सूचना देण्यात आली तेव्हा त्याना कपलकडे 66,000 युआन म्हणजे 7.88 लाख रूपये आढळले. पण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.
या घटनेबाबत सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे. ही घटना चीनच्या शांडोंग प्रांतातील आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, आरोप लावणाऱ्या व्यक्तीचा दावा आहे की, तो मृत मुलीचा खरा पिता आहे. एका कपलला त्यांनी मुलगी दत्तक दिली होती. ही व्यक्ती म्हणाली की, त्यांची मुलगी जियाओदानने इमारतीच्या 9व्या मजल्यावरून उडी मारत गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये आत्महत्या केली होती.
या मुलीला दत्तक घेतलेल्या कपलने तिला त्रास दिला. ते म्हणाले की, त्यानी आणि त्यांच्या पत्नीने जियाओदानला 2006 साली एका कपलला दत्तक देण्याचा निर्णय घेतला. कारण याना आधीच जुळी मुलं होती. त्यांच्याकडे इतके पैसे नव्हते की, तिसऱ्या अपत्याचं संगोपन करू शकतील. ते नातेवाईक बनून या कपलकडे मुलीला भेटण्यासाठी येत होते.
मृत मुलीच्या खऱ्या वडिलाने आरोप केला की, मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाचं एका मृत व्यक्तीच्या मृतदेहासोबत लग्न लावण्यात आलं. या बदल्यात त्या कपलने पैसे घेतले. दरम्यान चीनमध्ये घोस्ट मॅरेज म्हणजे मृत लोकांच्या लग्नाची परंपरा 3 हजार वर्ष जुनी आहे. कमी विकसित भागांमध्ये आजही याचं पालन केलं जातं.
त्यांचं मत आहे की, जर कुणाचं लग्न न होताच निधन झालं तर त्याची आत्मा त्याच्या नातेवाईकांना त्रास देते. कारण मृत्यूनंतरच्या जगात त्याला कुणी जोडीदार नसतं. त्यामुळे त्यांचं लग्न मृत व्यक्तीसोबत लावून दिलं जातं.