भारतात पॉर्न सिनेमे (Porn Industry) बघणारा सर्वात मोठा तरूण वर्ग आहे. जगभरात सर्वात जास्त अॅडल्ट मुव्हीज भारतात बघितल्या जातात. या इंडस्ट्रीबाबत सांगितलं जातं की, यात भरमसाठ पैसा आहे. या इंडस्ट्रीचा भाग असणाऱ्या लोकांना पैशांची तंगी नाही भासत. पण अनेकदा जसं दिसतं तसं (Porn Industry Dark Secret) नसतं. गेल्या काही वर्षात इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी आत्महत्या केल्या. जास्तीत जास्त लोकांच्या मृत्यूनंतर हा खुलासा झाला की, ते डिप्रेशनमद्ये होते. जर या इंडस्ट्रीमद्ये इतके पैसे आहेत तर मग कलाकार डिप्रेशनमध्ये का जात आहेत?
३० जूनला ३१ वर्षीय डेहलिया स्काय (Dahlia Sky) लॉस एंजलिसमद्ये तिच्या कारमध्ये मृत आढळून आली. तिला डोक्यावर गोळी लागली होती. असं सांगितलं जात आहे की, तिने स्वत:वर गोळी झाडली होती. चौकशीतून पोलिसांना आढळून आलं की, ती डिप्रेशनमध्ये होती. तिला ब्रेस्ट कॅन्सरही होता. तोही चौथ्या टप्प्यातला. एडल्ट सिनेमे तयार करणाऱ्या हंसने सांगितलं की, पॉर्न सिनेमात काम करून तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. तुमच्याकडे पैसे तर भरपूर असतात. पण तुम्ही एकटे पता कुणी मित्र नाही आणि परिवाराची साथही सुटते.
काही महिन्यांपूर्वी लॉस एंजलिसमध्ये अमेरिकन पॉर्न स्टार डकोटा स्टायने सुद्धा आपल्या घरात आत्महत्या केली होती. तिच्याही खाजगी आयुष्यात अडचणी सुरू होत्या. सोबतच एका फोटोशूटमुळे तिला ट्रोल केलं जात होतं. ते तिला सहन झालं नाही आणि तिने आत्महत्या केली.
डकोटाच्या जवळच्या मैत्रिणीने 'द सन'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, इंडस्ट्रीमध्ये अनेक प्रकारचे चॅंलेज आहेत. तुम्हाला कमी लेखलं जातं. अशात तुम्ही हे सांगू शकत नाही की, कुणाच्या मनात काय चालू आहे. कॅमेरा बंद झाल्यावर प्रोड्यूसरपासून ते लाइट बॉयपर्यंत कोण काय बोलेल सांगता येत नाही.
७ जुलैला रशियन पॉर्न अभिनेत्री क्रिस्टीना लिसिन बाइसवे फ्लोरवरून पडून तिचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच ती नव्या बॉयफ्रेन्डसोबत शिफ्ट झाली होती. त्यानंतर तिने पॉर्न इंडस्ट्रीला सोडलं होतं. अशात अचानक तिच्या मृत्यूने सगळेच हैराण झाले. क्रिस्टीनाच्या मित्रांनी सांगितलं की, तिच्या मृत्यूमागे काही रहस्य आहेत, जे तिच्यासोबतच गेले. पण हे स्पष्ट आहे की, इंडस्ट्री सोडल्यावरही तिला टोमणे ऐकावे लागत होते. ज्यामुळे ती वैतागली होती. या सर्व केसेसमध्ये हे कॉमन आहे की, पॉर्न इंडस्ट्रीच्या आतली दुनिया तेवढी चमकदार नाही, जेवढी दिसते. आत फार डिप्रेशन भरलेलं आहे. ज्यामुळे कलाकार आपलं जीवन संपवण्यासही तयार असतात.