काबूल: काबूलमध्ये प्रवेश करुन तालिबाननंअफगाणिस्तान ताब्यात घेतलं आहे. यानंतर मागील काही दिवसांपासून अफगाणिस्तानातून अनेक धक्कादायक आणि विचित्र व्हिडिओ समोर येत आहेत. काही व्हिडिओमध्ये अफगाणी नागरिकांवर गोळीबार झालेला, काही व्हिडिओमध्ये विमानतळावर गोंधळ उडालेला तर काही व्हिडिओमध्ये तालिबानी सैनिक लहान मुलांच्या खेळण्या खेळत असलेला. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत एक अफगाणी ट्रॅफिक पोलिस दिसत आहे. अफगाणिस्तान ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मांनी शेअर केला आहे. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहीले, '#Afghan #TrafficPolice चुकीला माफी नाही'. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक माणूस रस्त्याच्या मधोमध खांद्यावर बंदूक आणि हातात एक विचित्र उपकरण घेऊन उभा आहे. तो रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना सलाम करत आहे.
हा व्हिडिओ अफगाणिस्तान वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओला आतापर्यंत 8 हजारांहून अधिक वेळा पाहिला आहे. लोक व्हिडिओ पाहून अनेकजण मजेशीर कमेंट करत आहेत. दरम्यान, हा व्हिडिओ कधीचा आहे याची माहिती मिळू शकलेली नाही.