यासमीना अली अफगाणिस्तानची (Afganistan) एकुलती एक पॉर्न स्टार (Porn Star Yasmeena Ali) आहे. तिचं मत आहे की, तालिबानला तिच्या कामाची पूर्ण माहिती आहे आणि शक्यताही आहे की, तालिबानी लोक तिचे सिनेमे बघतही असतील. यासमीना सध्या अफगाणिस्तानमध्ये नाही. पण १९९० मध्ये जेव्हा तालिबानने काबूलवर विजय मिळवला होता. तेव्हा ती तिथेच होती. त्यावेळी तिने तालिबानची क्रूरता जवळून पाहिली होती.
मुस्लिम धर्म सोडून बनली नास्तिक
'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, यासमीना अली बालपणापासूनच अफगाणिस्तानातून ब्रिटनमध्ये आली होती. आता तिला अफगाणिस्तानातील एकमेव पॉर्नस्टार म्हणून ओळखलं जात. अॅडल्ट इंडस्ट्रीत पाउल ठेवण्यासाठी तिने मुस्लिम धर्म सोडला आणि नास्तिक बनली. यासमीना म्हणाली की, तालिबान पॉर्नहब आणि ओन्लीफॅन्ससारख्या वेबसाइटवरील तिच्या कामावर नजर ठेवू असू शकतात.
तालिबानला माझ्या कामाचा राग
'आय हेट पॉर्न' पॉडकास्टवर बोलताना ती म्हणाली की, 'तालिबान माझ्या कामावर नाराज आहे. कारण त्यांना नकोय की, अफगाणिस्तान पॉर्नसाठी ओळखला जावा. ते म्हणतात की, मी माझं शरीर दाखवण्याची हिंमत कशी केली? ते मानतात की,माझ्या शरीरावर त्यांचा अधिकार आहे आणि जर मी माझं शरीर दाखवत असेल तर मी खरी अफगाणी नाही'.
यासमीना सांगते की, तिला फरक पडत नाही की, तालिबान तिच्याबाबत काय विचार करतो. ती एक अफगाणी गर्ल आहे आणि हीच तिची ओळख आहे. ती म्हणाली की, 'कुणाला माहीत तालिबानी माझे अॅडल्ट व्हिडीओ बघत असतील. मला विश्वास आहे की ते मला चांगल्या प्रकारे ओळखत असतील. गूगलवर फक्त अफगाण पॉर्न लिहायचं आणि माझं नाव समोर येईल.
पॉर्न स्टार यासमीनाने तालिबानच्या क्रूरतेबाबत बोलताना सांगितलं की, तालिबानी महिलांना एखाद्या वस्तूसारखं ट्रिट करतात. त्यांच्यासाठी आमच्या भावना, इच्छा काही महत्वाच्या नाहीत. एकदा माझी आई मला म्हणाली होती की, तालिबानी राज्यात बलात्कारसारखी काही गोष्ट नसते. तालिबानी कुणासोबतही काहीही करू शकतात. यासमीना म्हणाली की, बालपणी तिने पाहिलं की लोकांना धार्मिक न होणे आणि योग्य प्रकारे धार्मिक पोशाख न घातल्याने मारलं जात होतं. महिलांसोबत पुरूषांनाही तालिबानी क्रूरतेचा सामना करावा लागत होता.
हिंसा करणाऱ्यांच्या हातात सत्ता
यासमीना अलीने ब्रिटनच्या एका घटनेचा उल्लेख करत सांगितलं की, इथे तुम्ही कोणत्याही वादासाठी पोलिसांना कॉल करू शकता आणि ते तुमच्या सुरक्षेसाठी पोहोचतात. पण अफगाणिस्तानमध्ये हिंसा करणारेच सरकार चालवतात, अशात लोक मदत कुणाकडे मागतील? यासमीन ९ वर्षांची असतानाच यूकेमध्ये आली होती आणि तिथेच तिने शिक्षण पूर्ण केलं.