मुंबई: सोशल मीडियावर एखादी गोष्ट हिट ठरली की, मग त्याला फॉलो करण्याचा ट्रेंड सुरू होतो. कालपासून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण नृत्यशैलीमुळे इंटरनेटवर व्हायरल झालेल्या संजीव श्रीवास्तव उर्फ डान्सिंग अंकल यांच्याबाबतही हाच प्रकार अनुभवायला मिळत आहे. अमेरिकेतील एका तरूणीने त्यांच्याप्रमाणेच डान्स करतानाचा एक व्हिडीओ यू-ट्यूबवर शेअर केला आहे. दीपा ब्रार असे या तरूणीचे नाव आहे. व्यावसायिक नर्तक असलेल्या या तरुणीचे अनेक व्हिडीओ यू-ट्युबवर उपलब्ध आहेत. मात्र, डान्सिंग अंकलची कॉपी असलेला तिचा व्हिडीओ खूपच लोकप्रिय होताना दिसत आहे.गोविंदा आणि निलम यांच्या 'खुदगर्ज' (1987) चित्रपटातलं 'दिल बहलता है मेरा.. आपके आ जाने से' या गाण्यावर डान्स करणारे संजीव श्रीवास्तव रातोरात लोकप्रिय झाले होते. डान्सिंग अंकल म्हणून त्यांचे व्हीडिओ तुफान व्हायरल झाले. त्यांना शोधण्यासाठी प्रसारमाध्यमांची एकच धावाधाव सुरु झाली. अखेर ते सापडलेही. संजीव श्रीवास्तव हे भोपाळच्या विदिशामध्ये राहणारे आहेत. भाभा विद्यापीठात ते प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. संजीव यांनी नागपूरमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. लहानपणापासूनच त्यांचा डान्सची आवड आहे. त्यांनी अनेक डान्स शोमध्येही भाग घेतला. संजीव 1982 पासून डान्स करत आहेत. नृत्याची प्रेरणा त्यांनी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्याकडून मिळाली. गोविंदाच्या ‘लव 82’ हा सिनेमा त्यांना अतिशय आवडतो. त्यांनी मध्य प्रदेशात अनेक नृत्यांच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन प्रथन पारितोषिकही मिळवलं आहे. 'एमटेक'चं शिक्षण घेतलेल्या संजीव यांनी 1998साली नृत्याची आवड सोडून प्रोफेसर म्हणून काम करायला सुरूवात केली होती.
डान्सिंग अंकलची अमेरिकेतील शिष्या पाहिलीत का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 9:16 PM