जॉबच्या ठिकाणी नेहमी कर्मचाऱ्याचे सहकारी किंवा बॉससोबत वाद होतात हे सामान्य आहे. रागाच्या भरात ज्यादिवशी मी नोकरी सोडेन तेव्हा याची वाट लावेन अथवा काही वाईट बोलले जाते. परंतु एका महिलेने खरेच हे कृत्य केले. रेस्टॉरंटची नोकरी सोडल्यानंतर तिने मॅनेजर आणि टीमसोबत जे काही केले ते ऐकून तुम्ही डोक्यावर हात माराल.काही लोकांनी महिलेच्या कृत्याला समर्थन दिले तर काहींनी तिची खिल्ली उडवली आहे.
रेडिटने प्लॅटफॉर्मवर या महिलेने पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहिलंय की, मला या गोष्टीची पर्वा नाही की मला कुणी बालिश समजेल.मी सांगू शकत नाही की माझ्यासोबत या नोकरीत किती वाईट व्यवहार झाले आणि ते पूर्ण टीमने केले. कारण या टीममध्ये मी एकटी महिला होती. हे सांगून मी जेंडर कार्ड खेळत नाही.
या महिलेने नोकरी सोडल्यावर एक आठवड्यानंतरही ती तिच्या मॅनेजरच्या एका खास सॉफ्टवेअरमध्ये लॉग इन असल्याचे निदर्शनास आले. मॅनेजरने पासवर्डही बदलला नव्हता. हे अकाऊंट रेस्टॉरंटच्या डेटाबेसचे होते. त्यात मेन्यू, स्टाफ ऑर्डरिंग, स्टॉक इत्यादी माहिती होती. मी त्यातील ईमेल बदलून त्यात माझा फेक ईमेल आयडी टाकला. त्यानंतर मी सर्व पासवर्ड टाकून त्याला कुणीही वापरू शकत नाही असं केले.
दरम्यान, महिलेच्या या पोस्टला ८ हजाराहून अधिक लाईक्स आले. यावर लोकांनी बऱ्याच कमेंट्स केल्या. काही लोकांनी महिलेच्या कृ्त्याचे समर्थन केले. एका यूजरने म्हटलं की, प्रामाणिकपणे सांगतो तुम्ही केले हे तुमच्यासाठी चांगले आहे. परंतु तुम्हाला स्वत:उभे राहायला शिकायला हवं होते. कारण तुम्ही प्रत्येक ठिकाणी असे करू शकत नाही. तर काहींनी मला हे कृत्य बालिशपणाचे वाटते. टॉक्सिक वातावारणात काम करणे किती कठीण असते हे मी समजू शकतो असं सांगितले आहे.