मलेशियातील एका विद्यार्थ्याचं एक ट्विट सध्या फारच चर्चेचा विषय ठरत आहे. कारणही तसंच आहे. या विद्यार्थ्याचा फोन चोरी झाला होता. Zackrydz Rodzi असं त्याचं नाव असून त्याला त्याचा फोन घरामागील जंगलात सापडला. पण जेव्हा त्याने फोनमधील गॅलरी चेक केली तेव्हा त्याला धक्का बसला. कारण त्यात माकडाचे अनेक सेल्फी होते. त्याला असं वाटलं होतं की, त्याचा फोन तो झोपलेला असताना चोरी झाला.
२० वर्षीय Zackrydz ने सांगितले की, झोपेतून उठल्यावर त्याला फोन दिसला नाही. महत्वाची बाब म्हणजे चोरी झाल्याचं काही साइनही दिसलं नाही. कुणीतरी गंमत केल्याचं त्याला आधी वाटलं होतं. Zackrydz ने नंतर फोन ट्रॅक केला आणि त्याला त्याच्या घरामागील जंगलात फोन सापडला. त्याने सांगितले की, त्याचे वडील त्याच्या फोनवर सतत फोन करत होते. त्याने फोनच्या रिंगचा आवाज ऐकला होता. हा आवाज जंगलातून येत होता.
फोन सापडल्यावर त्याच्या काकाने गंमतीने म्हटले की, फोनमध्ये चोराने फोटो काढला असेल तर चेक कर. त्यानंतर Zackrydz ने फोनची गॅलरी ओपन केली. आणि त्यात त्याला माकडाचे कितीतरी सेल्फी आणि व्हिडीओज् दिसले. बीबीसीसोबत शेअर केलेल्या एका व्हिडीओत माकडाने फोन खाण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसत आहे.
Zackrydz ने डेली मेलला सांगितले की, 'हे फोटो जेव्हा त्याने घरातील लोकांना आणि मित्रांन दाखवले तेव्हा त्यांनी यावर विश्वासच ठेवला नाही. कारण असा प्रकार क्वचितच बघायला मिळतो'. Zackrydz माकडाने काढलेले सेल्फी आणि व्हिडीओज् ट्विटरवर शेअर केले. या फोटोंना आतापर्यंत २.५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत.
हे पण वाचा :
Video : मास्क न घातला हंसाजवळ गेली अन् हंसाने रागात 'या' महिलेसोबत केलं असं काही...
बापरे! रस्त्याच्या कडेला पांढरी चादर ओढून झोपलेल्या माणसाला लोक मृतदेह समजले अन् मग....
हाताने नाकावरचे पिंपल्स फोडणं चांगलंच अंगाशी आलं; मेंदूत झालं गंभीर इन्फेक्शन अन् मग...